✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्पर्शून तारकांना..

प — प्राजु, Fri, 04/23/2010 - 19:17
स्पर्शून तारकांना गाई पहाट वारा कंपीत शब्द माझे आणि तुझा इशारा!!! गंधात नाहलेली, लाजून जात जाई घेई उगा मिटूनी, तो शुभ्रसा पिसारा झंकारले अशी की, काया सतार झाली तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा आली भरात आता, भलतीच प्रेम वेला बेबंध श्वास माझे आणि तुझा उबारा.. स्पर्शात या तुझ्या रे, वर्षाव हा हिमाचा पेटून तप्त होई, माझ्या उरी निखारा दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा - प्राजु

प्रतिक्रिया द्या
4149 वाचन

💬 प्रतिसाद (24)

दर्यास या

विसोबा खेचर
Fri, 04/23/2010 - 19:31 नवीन
दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा
वा प्राजू, जियो..! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

छान

मीनल
Fri, 04/23/2010 - 19:49 नवीन
रात्रीच्या तारकांना स्पर्शून होणारी पहाट, लाजून स्वत:ला मिटून घेणे, सतारीच्या झंकारीसारखा शहारा, भरात आलेला बेबंद श्वास, उधाण आलेले असताना जाणारा तोल हे सारे एकमेकांशी निगडित आहे. हिमाचा वर्षाव आणि उरीचा निखारा हेही आवडले. परस्पर विरूध्द तरी ही इथे मात्र पूरक आहेत. क्लासिक रोमांस! :X मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Mon, 04/26/2010 - 00:00 नवीन
कविता आवडली. (प्रणयप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

छान..

स्वाती दिनेश
Fri, 04/23/2010 - 19:52 नवीन
प्राजु, कविता आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

कविता छान

दिपाली पाटिल
Fri, 04/23/2010 - 20:35 नवीन
कविता छान वाटली... दिपाली :)
  • Log in or register to post comments

आणखी एक

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/23/2010 - 20:49 नवीन
आणखी एक सुंदर कविता प्राजु! आता अगदी रहावत नाही आहे म्हणूनः कविता वाचून विडंबन करावं असं वाटलं, पण हाय दारू सोडून दुसरा विषय सुचतच नाही आहे. अदिती
  • Log in or register to post comments

सुंदर...

मदनबाण
Fri, 04/23/2010 - 20:58 नवीन
सुंदर... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

सर्वांशी सहमत

sur_nair
Fri, 04/23/2010 - 21:59 नवीन
सर्वांशी सहमत असेच म्हणतो
  • Log in or register to post comments

सुन्दर

स्पंदना
Fri, 04/23/2010 - 22:41 नवीन
अतिशय सुन्दर!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

सर्वच

अरुंधती
Sat, 04/24/2010 - 02:24 नवीन
सर्वच काव्य खूप सुंदर, नादमधुर व उत्कट! :-) मस्त! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

निशःब्द...... (

डावखुरा
Sat, 04/24/2010 - 02:34 नवीन
निशःब्द...... (गालावरुन कधी मोरपीस फिरवले आहे का? अगदी तोच अनुभव आला...) "राजे!"
  • Log in or register to post comments

आवडली...

राजेश घासकडवी
Sat, 04/24/2010 - 02:36 नवीन
एक धुंदी छान उतरली आहे सहजशब्दात... वर्षाव हिमाचा उष्ण कटिबंधी रूपकांमध्ये बसत नाही असं वाटलं.
  • Log in or register to post comments

सुन्दर!!!!

रानी १३
Sat, 04/24/2010 - 13:20 नवीन
खुपच सुंदर आणि उत्कट! !!!!!
  • Log in or register to post comments

वाह प्राजु..

दिपक
Sat, 04/24/2010 - 13:28 नवीन
अत्यंत सुंदर.. खुप आवडली.
  • Log in or register to post comments

झंकारले

भोचक
Sat, 04/24/2010 - 17:30 नवीन
झंकारले अशी की, काया सतार झाली तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा
भन्नाट. मस्तच लिहिलैय. प्राजूतै. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

गाणे

चित्रा
Sat, 04/24/2010 - 17:38 नवीन
कवितेचे गाण्यात रूपांतर होऊ शकेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

वा.......!!

जयवी
Sat, 04/24/2010 - 17:44 नवीन
प्राजु........फार गोड कविता :)
  • Log in or register to post comments

झंकारले

मनीषा
Sun, 04/25/2010 - 09:12 नवीन
झंकारले अशी की, काया सतार झाली तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा सर्वच कल्पना आणि शब्दरचना सुरेख आहेत . अतिशय सुंदर कविता
  • Log in or register to post comments

कविता

अविनाशकुलकर्णी
Sun, 04/25/2010 - 15:54 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त!!

प्रभो
Sun, 04/25/2010 - 21:41 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

मस्त !!

अम्रुताविश्वेश
Mon, 04/26/2010 - 08:44 नवीन
खूपच सूरेख :) :X
  • Log in or register to post comments

अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ! ! !

निरन्जन वहालेकर
Mon, 04/26/2010 - 10:17 नवीन
अतिशय सुरेख कविता ! खूप खूप आवडली ! ! आतापर्यंत मिपा वर तुमच्या बहारदार कविता वाचल्यात आता नवीन अल्बम ची सी डी एकण्यांत कधी येते याची उत्सुकता आहे नवीन सीडी व कविता प्रकाशनासाठी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ! ! !
  • Log in or register to post comments

दर्यास या

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 04/26/2010 - 15:45 नवीन
दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा फारच छान binarybandya™
  • Log in or register to post comments

वा वा!

चतुरंग
Tue, 04/27/2010 - 01:22 नवीन
छान कल्पना आहेत. आमची पेश्शल प्रतिक्रिया इथेही वाचता येईल! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा