पुरुषप्रधान संस्कृतीत होणारे स्त्रीचे परंपरागत चित्रण आणि आधुनिक समाजात त्याविषयी घेतले जाणारे आक्षेप यांवरून सध्या या संस्थळावर जी विविध मतमतांतरे प्रदर्शित होत आहेत, त्यावरून 'गेरिला गर्ल्स' या लढाऊ स्त्रीवादी गटाने चालवलेल्या चळवळीची आठवण झाली. संग्रहालयात लावलेल्या तथाकथित अभिजात कलेच्या प्रदर्शनामधूनही पुरुषप्रधान संस्कृतीचे कळत-नकळत कसे लांगूलचालन होत असते, हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेले एक भित्तिचित्र (पोस्टर) फार गाजले होते. न्यू यॉर्कच्या जगप्रसिध्द मेट्रोपॉलिटन म्युझियममधली ८५% नग्न चित्रे ही स्त्रियांची आहेत, पण संग्रहालयात स्त्री चित्रकारांची चित्रे मात्र ५% ही नाहीत, असे त्यांचे निरीक्षण होते:
त्यासाठी त्यांनी अँग्र या सुप्रसिध्द फ्रेंच चित्रकाराचे हे चित्र संदर्भ म्हणून वापरले होते:
पाश्चिमात्य मिथ्यकथांपैकी काही 'नीती शिकवणार्या' कथांचा त्यांच्या बोधाहून विपर्यस्त असा (पुरुषी वासना शमवण्यासाठी) शतकानुशतके वापर केला गेला. 'सुसाना अँड द एल्डर्स' ही त्यातलीच एक. जेंटिलेशी या इटालिअन चित्रकाराने त्या कथेवरून सतराव्या शतकात काढलेले हे चित्र पाहा:
'गेरिला गर्ल्स'ने त्याचे असे रूपांतर केले:
स्त्रीवरील बलात्काराच्या बातम्याही पोलीस टाईम्स वगैरे मधून वाचकांच्या रंजनासाठी ज्या चवीचवीने दिल्या जातात, त्यातही असाच प्रकार असतो.
'गेरिला गर्ल्स'ची इतर भित्तिचित्रे इथे पाहाता येतील.
यातून उपदेश वा टीका करण्याचा हेतू नाही. फक्त पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा या विषयाकडे एका कमालीच्या बंडखोर प्रवृत्तीतून कसे पाहिले गेले आहे, याची जाणीव करून देणे गरजेचे वाटले.
त्यासाठी त्यांनी अँग्र या सुप्रसिध्द फ्रेंच चित्रकाराचे हे चित्र संदर्भ म्हणून वापरले होते:
स्त्रीवरील बलात्काराच्या बातम्याही पोलीस टाईम्स वगैरे मधून वाचकांच्या रंजनासाठी ज्या चवीचवीने दिल्या जातात, त्यातही असाच प्रकार असतो.
'गेरिला गर्ल्स'ची इतर भित्तिचित्रे इथे पाहाता येतील.
यातून उपदेश वा टीका करण्याचा हेतू नाही. फक्त पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा या विषयाकडे एका कमालीच्या बंडखोर प्रवृत्तीतून कसे पाहिले गेले आहे, याची जाणीव करून देणे गरजेचे वाटले.
वाचने
7613
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय
+१
In reply to अतिशय by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
हेच म्हणाते..
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम माहिती
छान
हाहाहा ...
येनकेनप्रकारेण
हाहाहा
In reply to येनकेनप्रकारेण by प्रमोद देव
+१
In reply to येनकेनप्रकारेण by प्रमोद देव
कीर्तन की तमाशा?
In reply to येनकेनप्रकारेण by प्रमोद देव
गेरिला, गिरुला, गोरिला
इथे
In reply to गेरिला, गिरुला, गोरिला by सन्जोप राव
बरोबर
In reply to इथे by ३_१४ विक्षिप्त अदिती
चर्चा
In reply to बरोबर by चिंतातुर जंतू
सुंदर स्त्रियांच्या तोंडावर माकडाचे मुंडके लावण्याचा हा
जबरी
In reply to सुंदर स्त्रियांच्या तोंडावर माकडाचे मुंडके लावण्याचा हा by वेताळ
जबरी!
हे असलं
हॅहॅहॅ
In reply to हे असलं by Pain