अभिनंदन छोटा डॉन!

महेश हतोळकर's picture
महेश हतोळकर in जनातलं, मनातलं
26 Mar 2010 - 10:20 am

छोटा डॉनच्या ब्लॉगची सकाळने घेतलेली दखल!
http://www.esakal.com/esakal/20100325/5160732294887613459.htm

* फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा.

लगे रहो डॉन भाई. अभिनंदन.

क्रीडामौजमजाअभिनंदन

प्रतिक्रिया

नील_गंधार's picture

26 Mar 2010 - 10:46 am | नील_गंधार

मस्त रे डॉन भाऊ,
हार्दिक अभिनंदन!

नील.

इंटरनेटस्नेही's picture

26 Mar 2010 - 10:52 am | इंटरनेटस्नेही

हार्दिक अभिनंदन!

जयवी's picture

26 Mar 2010 - 11:04 am | जयवी

छोटा डॉन... तुमच्या विनोद बुद्धीला सलाम :)

मनापासून अभिनंदन !!

II विकास II's picture

26 Mar 2010 - 11:08 am | II विकास II

अभिनंदन छोटा डॉन.
छोटा डॉन नेहमी मिपावर लेख लिहितो. पण त्याने हा लेख मिपावर का लिहीला नाही, काही कल्पना नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 11:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन नेहमी मिपावर लेख लिहितो. पण त्याने हा लेख मिपावर का लिहीला नाही, काही कल्पना नाही.

॥विकास॥, हे आहे हे असं आहे, पटलं तर रहा नाहीतर (स्वत:च्याच) चपला घेऊन चालू पडा.

बाकी डॉनरावांच्या अभिनंदनाचा आणखी धागा आणि सकाळ, स्टार माझाबद्दलची चर्चा इथे आहे.

अदिती

श्रावण मोडक's picture

26 Mar 2010 - 11:29 am | श्रावण मोडक

हाण्ण तिच्या...

महेश हतोळकर's picture

26 Mar 2010 - 11:34 am | महेश हतोळकर

:)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2010 - 12:57 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. || विकास ||

तुमचा प्रतिसाद खोडसाळ वाटला. कारण स्पष्टपणे असे.... जे काही घडले / घडते आहे त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे. आपण स्वतःला माहितीबाबतीत अपटुडेट ठेवता असे माझे निरीक्षण आहे. मी चुकतही असेन, तसे असल्यास कृपया क्षमा करणे.

पण सध्या तरी आपला प्रतिसाद खोडसाळच वाटतो आहे कारण माहिती असूनही असे वाक्य आपण लिहिले.... त्यामुळे आपण आपल्या नावातील चार अक्षरे सार्थ केलीत असे वाटते. त्याऐवजी अन्य ३ अक्षरे सार्थ होतील तो सुदिन. असो.

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

26 Mar 2010 - 1:25 pm | अवलिया

बिपिनशेटच्या शब्दाशब्दाशी प्रचंड सहमत.
बाकी डान्रावांचे अभिनंदन आम्ही सगळीकडे केलेच आहे, इथेही करण्यात आम्हाला आनंदच वाटत आहे. असो.

मालक, संपादकांची मर्जी असेल तर हा प्रतिसाद टिकेल नाही तर हरी हरी !!!!!

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपीन, तुझ्यासारखे योग्य शब्द न सापडल्याने मालकांच्या शब्दांचा आधार घेतला होता. चारकाड्यावाल्या विकासचा निषेध.

डॉनरावांचे पुनश्च अभिनंदन

अदिती

चतुरंग's picture

26 Mar 2010 - 4:12 pm | चतुरंग

यांचा प्रतिसाद खोडसाळ आहेच, शंकाच नाही! करुन सवरुन नामानिराळे!! निषेध!!!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 4:14 pm | विसोबा खेचर

बिपिनसाहेब,

कारण स्पष्टपणे असे.... जे काही घडले / घडते आहे त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे

काय घडले आहे? कशाबद्दल बोलता आहात आपण?

पण सध्या तरी आपला प्रतिसाद खोडसाळच वाटतो आहे कारण माहिती असूनही असे वाक्य आपण लिहिले....

विकासने काय खोडसाळपणा केला हे कळेल का?

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 5:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अलिकडेच कुठेतरी श्री. ॥विकास॥ यांनी एका प्रतिसादात काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं. आज अचानक त्याच लोकांपैकी छोटा डॉन यांच्या लेखनासाठी श्री, ॥विकास॥ तरसायला लागले ... खोडसाळपणाच वाटतो, नै का?
पटकन तो प्रतिसाद मिळाला तर लिंकही देतेच!!

अदिती

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 5:20 pm | विसोबा खेचर

अलिकडेच कुठेतरी श्री. ॥विकास॥ यांनी एका प्रतिसादात काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं. आज अचानक त्याच लोकांपैकी छोटा डॉन यांच्या..

॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे लिहीलं आहेच, पुन्हा एकदा लिहीते:
काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं.

कधी तर्काला सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणतात तर दुसर्‍या बाजूला झोपेचं सोंग घेणार्‍याला उठवता येत नाही अशीही म्हण आहे.

अदिती

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 5:46 pm | विसोबा खेचर

माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे लिहीलं आहेच, पुन्हा एकदा लिहीते:
काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं.

हो, परंतु त्याच्या पुढल्याच ओळीत आपण 'आज अचानक त्याच लोकांपैकी छोटा डॉन यांच्या..' असेही लिहिले आहे..

म्हणून त्यावर मी असे विचारले की '॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'

या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित..

तात्या.

छोटा डॉन's picture

26 Mar 2010 - 6:15 pm | छोटा डॉन

बहुसंख्य लोकांच्या मते ॥ विकास ॥ यांच्या खोडसाळ प्रतिसादाच्या अनुषंगाने चाललेल्या चर्चेत माझ्या नावाचा उल्लेख होतो हे पाहुन ४ शब्द खरडतो ...

>>म्हणून त्यावर मी असे विचारले की '॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
असो.
॥ विकास ॥ ह्यांच्या प्रतिसादात ज्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता त्यात मी आणि माझे काही जवळचे मित्र होतो / आहे. आता सदर मंडळी मिपावरुन का गायब झाली ( किंवा पहिल्याएवढी का मिपाची नाहीत राहिली ) ह्याचे कारण सर्वांना माहित आहे, उगाच पुन्हा त्याचा उहापोह करण्यात काही अर्थ नाही.
( अर्थात " कुठली कारणे ?" असा प्रश्न येऊ शकतो ही शक्यता गॄहीत धरुन आम्ही परस्पर आमचे आणि आमच्या काही मित्रांचे गायब झालेले जुने लेख / प्रतिसाद पहावेत असा सल्ला देतो ) ;)

बाकी राहता राहिला प्रश्न तो आमचे नाव घेण्याचा.
अहो तसे झाले असते तर आम्ही त्याची 'धिंड' नसती का काढली ?

बाकी तुमच्या ॥ विकास ॥ ह्यांना पाठीशी घालुन आम्हाला काही माहित / कळाले नाही हा अ‍ॅटिट्युड दाखवण्यात जर मिपाचे काही भले होत असेल तर त्यात आम्हालाही आनंद आहे. एक मात्र वाईट असे वाटते की ह्यासर्व प्रकरणात तुम्ही बिका, अदिती, रंगाशेठ सारख्या वरिष्ठ आणि जाणकार लोकांना "बिनबुडाचे" प्रश्न विचारत आहात ...

असो.
बाकी तुम्ही ".. येथे लेखन करणार्‍यांचा मी आभारी आहे, आणि न करणार्‍यांनाही घाऊक धन्यवाद! " असे म्हटलेच आहे.
सो, धन्यवाद !

स्वगत : कशाला लिहलास एवढा प्रतिसाद ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणून त्यावर मी असे विचारले की '॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'

मिपाच्या (जवळजवळ) सगळ्या संपादकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सांगते, जर त्याने ते नाव घेतलं असतं तर (डॉन्या म्हणतो त्याप्रमाणे धिंड निघाली असतीच, पण त्याच्या जोडीला) संपादकांनी व्यक्तीगत हल्ल्याचा भाग प्रतिसादातून काढून टाकला असता.

बाकी तुमच्या आदर असण्याबद्दल मला पूर्ण आदर आहे.

अदिती

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 11:14 pm | विसोबा खेचर

जर त्याने ते नाव घेतलं असतं तर...संपादकांनी व्यक्तीगत हल्ल्याचा भाग प्रतिसादातून काढून टाकला असता.

जर..तर च्या भाषेला अंत नसतो..

माझा प्रश्न होता आणि आहे,

॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'

जमल्यास उत्तर द्या..

धन्यवाद..

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 11:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

समझदार को इशारा काफी है।

अदिती

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 11:54 pm | विसोबा खेचर

माझ्याकडून उत्तर देण्याचा शेवटचा प्रयत्न

बरं बरं! मग प्रश्नच मिटला!

तात्या.

न सोचा न समझा न सिखा न जाना,
मुझे आ गया खुदबखुद दिल लगाना
जरा देखकर अपना जल्वा दिखाना ...
सिमट कर यहीं आ न जाए जमाना !

जुबां पर लगी है 'वफाओं' की मुहरें ,
खामोशी उसकी कह र ही हैं फसाना

गुलों तक लगाई तो आसां है लेकीन ,
है दुश्वार कांटोंसे दामन बचाना !

करो लाख तुम मातम ऐ नौ जवानों
पर 'मिर' अब नहीं आएगा वो जमाना !!
- मीर तकि मीर

~ वाहीदा

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2010 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. तात्यासाहेब, सांगतो.

गेल्या काही महिन्यांपासून, मिपावरील काही सदस्य काही कारणांमुळे इथे येत नाहीत. इथे लेखन करत नाहीत अथवा प्रतिसाद देत नाहीत. यामागचे कारण अथवा सगळेच डिटेल्स आपल्यालाही माहित आहेत आणि मलाही. तरीही, शक्यतो याची जाहिर चर्चा ना तुम्ही केलीत ना अजून कोणी. शेवटी, हे आपले सर्वांचे संस्थळ आहे आणि त्याची केवळ किर्ती वाढावी, अपकिर्ती नव्हे हे समान सूत्र आपणा सर्वांना बांधून ठेवते.

श्री. || विकास || हे मिपा तथा मिपाबाह्य व्यासपीठांवरून मराठी आंतरजालावरील सदस्यांशी संवाद साधतात. ते या जालिय घटनांची माहिती साधारणपणे ठेवतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अशा परिस्थितीत, श्री. छोटा डॉन यांनी आपले लेखन मिपावर करणे / न करणे हा एक थोडासा संवेदनाक्षम मुद्दा आहे हे कोणासही कळेल. असे सगळे असताना, अभिनंदन करताना मुद्दाम अशी एखादी ओळ लिहिणे हे माझ्या मते अनावश्यक आणि काहीही कारण नसताना मिपावर थोडा गदारोळ माजावा असे काहीसे ठरते. या आधीही काही शेरेबाजी त्यांनी केली होती पण ती बहुधा खरडवह्यांमधून असावी असे स्मरते म्हणून मौन धारण केले होते. आज एका धाग्यावर हे आले, कारण नसताना आणि त्यामुळे मिपावर काहीसे नकोसे घडू शकते म्हणून मी तसा प्रतिसाद लिहिला जेणेकरून सदर सदस्यमहोदयांना मिपावरील जबाबदार व्यक्तींचे मत कळावे. त्यांच्या प्रतिसादात, काहीही अश्लील अथवा वैयक्तिक रोखाचा मजकूर नसल्याने तो संपादित केला नाही. शक्य तितक्या सभ्य आणि सर्वमान्य होतील अशा शब्दात मी माझे म्हणणे मांडले. सुदैवाने श्री. चतुरंग यांनीही माझे समर्थन केले.

सदर सदस्याबद्दल या आधीही आपले काही मत-आदानप्रदान झाले आहे. मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. माझा प्रतिसाद माझ्या आजवरच्या एकंदर आकलनावरून आलेला आहे. माझे माणूसपण आड येऊन माझे काही चुकत असल्यास मला माफ करावे असेही मी तिथे नमूद केले आहे.

आपण आपुलकीने विचारले म्हणून सांगितले. असो.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2010 - 5:20 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून एक....

मी आता थोड्या वेळात ऑफलाईन जाईन. त्यामुळे, बाकी चर्चा नंतर.

बिपिन कार्यकर्ते

अता विषय काढलाच आहे तर डिटेलवारी येउद्या ना.... कशाला उगाच अफवांना उत आणायचा?

कवटी

आण्णा चिंबोरी's picture

26 Mar 2010 - 5:34 pm | आण्णा चिंबोरी

कवट्याशी सहमत

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 5:40 pm | विसोबा खेचर

गेल्या काही महिन्यांपासून, मिपावरील काही सदस्य काही कारणांमुळे इथे येत नाहीत. इथे लेखन करत नाहीत अथवा प्रतिसाद देत नाहीत. यामागचे कारण अथवा सगळेच डिटेल्स आपल्यालाही माहित आहेत आणि मलाही.

मला यातील खरेच काही माहीत नाही.. ज्यांना यायचे असेल ते येतील, न यायचे असेल ते नाही येणार हेच माझे प्रथमपासूनचे धोरण आहे.. जी मंडळी इथे येत नाहीत ती त्यांची वैयक्तिक मर्जी.. मी कुणालाही 'जा' असे सांगत नाही आणि 'रहा' असेही सांगत नाही.. ज्या काही सभासदांनी मुद्दामून मिपाविरुद्ध खोडसाळपणा केला त्यांचे सभासदत्व मी स्वत:हून गोठवले आहे/रद्द केले आहे..

तरीही, शक्यतो याची जाहिर चर्चा ना तुम्ही केलीत ना अजून कोणी.

तशी गरजही नाही.. मुळात हा जाहीर चर्चेचा विषयच नाही. ज्यांना मिपावर यावे/लिहावे असे वाटते, ते तसे करतात, ज्यांना तसे वाटत नाही ते येथे येत नाहीत आणि त्यांनी येऊही नये!

अशा परिस्थितीत, श्री. छोटा डॉन यांनी आपले लेखन मिपावर करणे / न करणे हा एक थोडासा संवेदनाक्षम मुद्दा आहे हे कोणासही कळेल.

यात माझ्या मते तरी संवेदनाक्षम असे काही नाही.. येथे लेखन करणार्‍यांचा मी आभारी आहे, आणि न करणार्‍यांनाही घाऊक धन्यवाद! :)

असे सगळे असताना, अभिनंदन करताना मुद्दाम अशी एखादी ओळ लिहिणे हे माझ्या मते अनावश्यक आणि काहीही कारण नसताना मिपावर थोडा गदारोळ माजावा असे काहीसे ठरते. या आधीही काही शेरेबाजी त्यांनी केली होती पण ती बहुधा खरडवह्यांमधून असावी असे स्मरते म्हणून मौन धारण केले होते. आज एका धाग्यावर हे आले, कारण नसताना आणि त्यामुळे मिपावर काहीसे नकोसे घडू शकते म्हणून मी तसा प्रतिसाद लिहिला जेणेकरून सदर सदस्यमहोदयांना मिपावरील जबाबदार व्यक्तींचे मत कळावे.

आपल्या म्हणण्याचा मी आदर करतो..

असो..

तात्या.

आणि इतरांनाही लिंका ( पक्षी : दुवे) पाठवुन माहितीबाबतीत अपटुडेट राहण्यासाठी मदत करता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे रा.को. डॉनराव यांनी उत्तर दिलेले आहे, ते जसेच्या तसे:

नमस्कार,
आवर्जुन आमच्या लेखाची दखल घेऊन अभिनंदनाचा धागा काढल्याबद्दल व त्यावर मनमोकळे ४ शब्द लिहल्याबद्दल धन्यवाद.

बाकी श्री. ॥ विकास ॥ ह्यांना उत्तर असे की आम्ही इथे 'न येण्याने व लिहण्याने' बरीच मंडळी सुखात आहेत व त्यामुळे बरेच चांगले साहित्य निर्माण होते असे आपल्याच प्रतिसादातुन वाचले होते.
सबब, ह्या चांगल्या वातावरणाला उगाच डिस्टर्ब नको म्हणुन आमचे लेखन इथे टाकले नाही.
पुर्वी इथे आम्ही भरभरुन लिहीत होतो पण आजकाल का बंद केले आहे ह्याची कारणे आमच्या इथल्या 'हितचिंतकांना' विचारावीत, त्यांच्याच इच्छेनुसार आम्हाला सदर निर्णय घ्यावा लागला.

असो.
हाच लेख दुसर्‍याच कोणीतरी इथे आपल्या नावाने खपवला होते असेही काही हितचिंतकांकडुन समजले होते. असो,कसेही का असेना, रसिकांपर्यंत साहित्य पोहचल्याशी मतलब !
मात्र तत्वांना अनसरुन त्यावर योग्य अ‍ॅक्शन घेणार्‍या 'जागरुक आणि तत्वप्रिय' संपादकांचेही इथे आम्ही आभार मानतो.

असो, तुर्तास एवढेच.

- ( आभारी ) छोटा डॉन

II विकास II's picture

26 Mar 2010 - 12:43 pm | II विकास II

श्री डॉन यांचे मत येथे पोचवायचे काम केल्या बद्दल आदिती यांना धन्यवाद देतो
बाकी श्री. ॥ विकास ॥ ह्यांना उत्तर असे की आम्ही इथे 'न येण्याने व लिहण्याने' बरीच मंडळी सुखात आहेत व त्यामुळे बरेच चांगले साहित्य निर्माण होते असे आपल्याच प्रतिसादातुन वाचले होते.
सबब, ह्या चांगल्या वातावरणाला उगाच डिस्टर्ब नको म्हणुन आमचे लेखन इथे टाकले नाही.

छोटा डॉन इथुन गेल्यामुळे कोणाला आंनद झाला असेल, असे मला तरी व्यक्तीशः वाटत नाही.

असो, पुन्हा एकदा अभिनंदन
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विदोही संकेतस्थळांना खास सुट.
योग्य बोली सह संपर्क करावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2010 - 12:52 pm | बिपिन कार्यकर्ते

डान्रावांचे अभिनंदन तर आहेच पण डान्राव आमचे उत्तम मित्र असल्याचा अभिमान वाटतो. असेच लिहित रहा साहेब...

बिपिन कार्यकर्ते

वाहीदा's picture

26 Mar 2010 - 3:24 pm | वाहीदा

पण हे ईसकाळ वाले पण काय बावळट आहेत
वरती
मुळ अनामिक लेखकाच्या विनोदबुद्धीला आमचा सलाम... अन खाली
फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा.
असे लिहले आहे .

लेखक अनामिक कसा ? छोटा डॉन' चे नाव माहीत नसेल तर विचारून तरी घ्यावे, ईसकाळ वाल्यांनी .

त्या ईसकाळ च्या फडणी स रावांची चांगलीच कानउघाडणी केली पाहीजे . ३ वाजून गेले तरीही त्यांनी बातमी एडीट करून डोन्याचे नाव घातले नाही ..निषेध !
अन डोन्याचे पुनश्च अभिनंदन !! =D> =D>
~ वाहीदा

वाहीदा's picture

26 Mar 2010 - 3:25 pm | वाहीदा

पण हे ईसकाळ वाले पण काय बावळट आहेत
वरती
मुळ अनामिक लेखकाच्या विनोदबुद्धीला आमचा सलाम... अन खाली
फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा.
असे लिहले आहे .

लेखक अनामिक कसा ? 'छोटा डॉन' चे नाव माहीत नसेल तर विचारून तरी घ्यावे, ईसकाळ वाल्यांनी .

त्या ईसकाळ च्या फडणी स रावांची चांगलीच कानउघाडणी केली पाहीजे . ३ वाजून गेले तरीही त्यांनी बातमी एडीट करून डोन्याचे नाव घातले नाही ..निषेध !
अन डोन्याचे पुनश्च अभिनंदन !! =D> =D>
~ वाहीदा

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2010 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार

त्या ईसकाळ च्या फडणी स रावांची चांगलीच कानउघाडणी केली पाहीजे . ३ वाजून गेले तरीही त्यांनी बातमी एडीट करून डोन्याचे नाव घातले नाही ..निषेध !

त्यांना काल दुपारीच मेल केली होती :) त्यांच्याकडून काही कळल्यास नक्कीच कळवु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 4:05 pm | विसोबा खेचर

असेच छान लिहा, खूप मोठे व्हा..

तात्या.

मिसळभोक्ता's picture

1 Apr 2010 - 2:42 am | मिसळभोक्ता

आमचे जालमित्र छोटा डॉन ह्यांचे अभिनंदन.

त्यांनी मोठे होऊ नये, छोटेच डॉन राहावे, ही सदिच्छा.

(बाकी दांडीवाले विकास ह्यांच्याबद्दल काय बोलावे/लिहावे ? त्यांची कारकीर्द बहुतेक मोठ्या झालेल्या सदस्यांना परिचित आहेच.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सुनील's picture

26 Mar 2010 - 5:01 pm | सुनील

छोटा डॉन यांचे अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Mar 2010 - 7:10 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री डॉन यांचे अभिनंदन!

पार्टी कधी ठेवताय ते सांगा. फोन नं. अन्यत्र आहेच ;)
आगाऊ आभारी -नरेश .

मुक्तसुनीत's picture

26 Mar 2010 - 6:25 pm | मुक्तसुनीत

मंडळी , ऊष्मा भारी झालाय. मस्तपैकी चिल्ड बीअर घ्या. (त्या चारदांड्या विकासरावाना २-३ पाजा ;-) )

डॉन्या , तुझा लेख रिसायकल होऊन किमान २-३ अशा लोकांनी मला इमेल वर पाठवला , ज्यांचा मराठी सायटींशी काहीही संबंध नाही ! सलाम आहे बॉस तुला ! लेके गये यार तुम तो !

Nile's picture

27 Mar 2010 - 12:16 am | Nile

काय हो मुसुशेठ, मी पाहतो आहे सद्ध्या तुम्ही बिअरचा फारच प्रचार करत आहात! यायला हवे काय इस्ट कोस्टावर? ;)

बाकी काड्या लावणार्‍यांनी काड्या घालाव्यात आणि इतरांनी ताल धरुन नाचावे, मराठी संकेतस्थळाला साजेसे. ;)

प्रभो's picture

27 Mar 2010 - 12:40 am | प्रभो

>>तुम्ही बिअरचा फारच प्रचार करत आहात!

थोड्याच महिन्यांपुर्वी भारतभेट झालीय..त्याचाच असर म्हणायचा का??

--प्रभो

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2010 - 1:21 pm | प्रकाश घाटपांडे

अहो श्रमपरिहारासाठी बिअर नको का? माय मराठि उत्सवात निळु दामले बी हे म्हनले व्हतेच की
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पिंगू's picture

26 Mar 2010 - 8:02 pm | पिंगू

डॉनराव हार्दिक अभिनंदन!!!! पण मिपावर लिखाण चालू ठेवा म्हणजे झाले........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2010 - 10:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉन्या, मन:पूर्वक अभिनंदन. पाट्या वाचतांना हहपुवा झाली होती.
सकाळमधील लेख आणि तेथील प्रतिसाद वाचून तर अजूनच कौतुक वाटलं...!

आज या निमित्तानं आठवण झाली आपल्या खरडी आणि लेखनाची. अरे साध्या-साध्या खरडी पाच-पाच किलोपेक्षा कमी वजनाच्या नसायच्या. प्रतिसादाचे वजन तर विचारुच नका. त्या वजनाने तर मी अनेकदा वाकून गेलो आहे. :)

अवांतर : सगळ्याच गोष्टी मला माहित नाही. पण ज्या पद्धतीने इथे काही प्रतिसाद दिसत आहेत. आणि विशेषत: इथे॥ विकास ॥ वर टीकेचे जे स्वरुप दिसत आहे. ते व्यक्तिगत मला न पटणारे आहे. समजा ॥ विकास ॥ यांनी खोडसाळपणा केला असेल तर असा खोडसाळपणा मिपावर करणारे ते पहिलेच आहेत का ? वरील प्रतिसादात जर कुठे खोडसाळपणा असेल म्हणून ते न पटणारे असू शकते. पण इथे तर अहमिका लागलेली दिसते ते कसे चूक आहेत हे ठरविण्याची. किंवा असे करुन त्यांनी फार मोठा गुन्हा केला आहे असे निदर्शनास आणल्या जात आहे. जसे काही त्यांनी फार मोठा अपराध केला आहे. त्यामुळे किंवा अन्य कारणामुळे आम्ही असे वागतो. किंवा ते तसे वागतात म्हणून आम्ही असे वागतो. याचा काहीच्या काही सबंध इथे वर चर्चेत मला दिसतो. आणि मला तरी या चर्चेच्या निमित्तानं ते न पटणारं आहे.

असो, आणि हेही माहित आहे की, हे सर्व चालायचेच....!

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

26 Mar 2010 - 10:53 pm | नितिन थत्ते

||विकास|| हे मिपावरील बर्‍यापैकी सक्रीय सदस्य आहेत. त्यामुळे गेला काही काळ काही मंडळी मिपावर लिहीत नाहीत / येत नाहीत / दिसत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेलेच असेल. 'छोटा डॉन' हे मिपावर नियमितपणे लिहितात आणि हाच लेख फक्त दुसरीकडे लिहिला असे असते तर ||विकास|| यांच्या प्रतिसादातील त्या वाक्याला अर्थ असता. अन्यथा मुद्दाम मागचे काही उकरून काडण्यासाठी (आणि पर्यायाने तात्या आणि छोटा डॉन यांच्यात पुन्हा काही खडाजंगी व्हावी म्हणून) ते वाक्य लिहिल्यासारखे वाटते. म्हणून बिकांनी प्रतिसादाला खोडसाळ म्हणणे योग्यच वाटते.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

प्रमोद देव's picture

26 Mar 2010 - 11:20 pm | प्रमोद देव

शाबास डॉन्राव.

अवांतर: बिरुटेसाहेबांच्या अवांतराशी पूर्णपणे सहमत.

छोटा डॉन's picture

26 Mar 2010 - 11:35 pm | छोटा डॉन

आज या निमित्तानं आठवण झाली आपल्या खरडी आणि लेखनाची. अरे साध्या-साध्या खरडी पाच-पाच किलोपेक्षा कमी वजनाच्या नसायच्या. प्रतिसादाचे वजन तर विचारुच नका. त्या वजनाने तर मी अनेकदा वाकून गेलो आहे.

=)) =)) =)) =))
बापरे, काय ही माझी ओळख !
असो, त्या निमित्ताने का होईना तुम्हाला आमची आठवण येते त्याचा आम्हाला आनंद आहे.

आमच्या कौतुकाचे ४ शब्द बोलणार्‍या सर्व मिपाकरांना मनापासुन धन्यवाद ... !!!

अवांतराविषयी :
माझ्या मते इथे कुणाला अकारण टार्गेट गेले नाही ... कुणाकडुनही, विनाकारण तर नाहीच नाही. आता श्री. ॥ विकास ॥ ह्यांना लोक का बोलत आहेत ह्यावर मी काही बोलु इच्छित नाही. खालचा श्री. थत्ते ह्यांच्या प्रतिसादाशी फक्त मी सहमत आहे असे म्हणतो.
बाकी जे लोक आमच्या बाजुने किंवा मोअर प्रिसाईजली श्री. ॥ विकास ॥ ह्यांच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांची एकंदर वाटचाल, लौकिक, कारकिर्द, सच्चेपणा, अनुभव, समंजसपणा इत्यादी गोष्टी विचारात घेऊनच मग काय तो 'मुद्दाम' का 'योग्य' हा वाद-विवाद व्हावा !

आता तात्यासाहेबांसाठी एक किस्सा :
>>॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
ते सोडा, मी एक किस्सा सांगतो तो ऐका :
एकदा ना एका माणसाच्या घरात चोर घुसतात. त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबियांना हाण हाण मरोस्तोवर हाणतात, जाताना सर्व कपडे, वस्तु वगैरे लुटुन घेऊन जातात.
ह्या माणसाला तर इतका मार बसतो की विचारु नका.
मग काय होते की दुसर्‍य दिवशी त्याचे मित्र, आप्त वगैरे चौकशीला येतात व त्याला विचारतात " का रे, खुप मारले का तुला त्यांनी ? "
तो म्हणतो " मारले असेल खुप, पण मी त्यांना शेवटपर्यंत गालगुच्चा काही घेऊ दिला नाही."
मित्र " अरे पण खुप मार पडला ना ?"
माणुस " पडला ही असेल, पण मी त्यांना गालगुच्चा काही घेऊ दिला नाही".

मॉरल : एवढे सगळे घडुन गेल्यावर एका क्षुल्लक पर्टिक्युलर गालगुच्च्याचे महत्व ते काय ? शिवाय त्याच्या जोरावर कॉलर ताठ करुन घेण्यात हाशील ते काय ?
असो, छान होता नै किस्सा, मी तर खुप हसलो पहिल्यांदा ऐकला तेव्हा ! :)

असो, पुन्हा एकदा आमची आठवण काढणार्‍या आणि कौतुक करणार्‍या सर्व मित्रांचे आभार ... :)

------
( जुन्या मित्रांची लै आठवण येणारा ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 11:55 pm | विसोबा खेचर

॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
ते सोडा,

बरं बरं! ते सोडलं..!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2010 - 11:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>असो, त्या निमित्ताने का होईना तुम्हाला आमची आठवण येते त्याचा आम्हाला आनंद आहे.

गम्मत जाऊ दे, पण मी मागेही एकदा सांगितले होते. संकेतस्थळावर आपले काही खास मित्र आहेत. जिन्हे मिलनेको जी चाहता है. ज्यांचे लेखन आवडीने वाचावे वाटते. [पाहा: संदर्भ ऑर्कूटवरच्या बाता]

असो, बाकीचं जीमेल वर बोलू...! :)

-दिलीप बिरुटे
[डॉन्याचा मित्र]

II विकास II's picture

27 Mar 2010 - 12:05 am | II विकास II

ऑर्कुटचा विषय निघालाच आहे तेव्हा डॉन्याला लिहीलेली टेस्टीमोनीयल आठवली.
असो. अजुनही डोन्याच्या प्रोफाईलमध्ये आहे.

aamacha Danya, kadhihi vayade na palnara, abhruchi che photo ajun milale nahit.
misalpav var sagalyat jast mothya kharadi lihinara,
changala mulaga aahe.
thodasa gambeer vichar karnara.
rajkaran aavdata vishay.

-Vikas

बाकी प्रतिक्रिया सवडीने ...
असो.

वेताळ's picture

26 Mar 2010 - 11:13 pm | वेताळ

डान रावांचे आपण पहिल्यापासुन फॅन आहोत.पण अलिकडे मिपावर भेट होत नव्हती.वरील खडाजंगीतुन कारण कळाले. ;)
पण आयपीएल आणि पुणेरी पाट्या एकदम झ्याक.
पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा. तसेच श्री मी ह्याचे देखिल आभार त्यानी हा धागा काढला त्यामुळे डानरावांच्या लेखाची माहिती मिळाली.
वेताळ

मुत्सद्दि's picture

26 Mar 2010 - 11:48 pm | मुत्सद्दि

वाह.
छानच रंगलेली दिसतेय चर्चा.
असो,
छोटा डॉन का जे कोणी आहेत त्यांचे अभिनंदन.
त्यांचा लेख वाचून खरेच दिल खुश झाला.

मुत्सद्दि

अवांतर : संपादकांनी मिपावर घडणा-या सर्वच खोडसाळपणाच्या बाबतीत जागरूक रहायला पाहिजे. नाही का?
इतर वेळेला हेच संपादक "खोडसाळपणा" करणा-यांचे कौतुक त्यांच्या खरडवहीत जाउन करताना दिसतात,ते योग्य नव्हे.

टिउ's picture

27 Mar 2010 - 12:34 am | टिउ

च्यायला! आम्ही वेळ मिळाला की मिसळपाववर चक्कर टाकतो...पण त्यामुळे काय चाललंय, कोण आलं, कोण गेलं काही कळत नाही. दर वेळी नवीन नवीन आयडी दिसतात. तरी मी विचार करतच होतो की दंगल कंपू अचानक कुठे गायब झाला!

असो...छोटा डॉन यांचं अभिनंदन!

टिपः प्रतिसाद अजिबात खोडसाळ नाही. आमच्याकडे सर्व प्रकारची आउटडेटेड माहिती मिळेल...

रेवती's picture

27 Mar 2010 - 12:39 am | रेवती

अभिनंदन छोटा डॉन!
लेखन आवडले.
माझा प्रतिसाद ५० वा आहे. तो पुढच्या पानावर ढकलू नये.:)

रेवती

Nile's picture

27 Mar 2010 - 12:44 am | Nile

घ्या प्रतिसाद संपादीत करुन! ;)

इनोबा म्हणे's picture

27 Mar 2010 - 12:50 am | इनोबा म्हणे

कुणी कुठे लिहावं अथवा लिहू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. त्यासाठी कुणीही उठून आपण मारे 'पतिव्रता' असल्याचा आव आणत गमजा मारायची गरजच काय? आपण एकमेकांशी (वैयक्तीकरीत्या) कितीही चांगले वागत असलो तरी वाद हा कुठल्यातरी मुद्द्यांवर असतो. तेव्हा उगाच "आम्ही तेव्हा 'त्वमेव माताच् पिता त्वमेव' म्हणालो होतो" वगैरे टाईपच्या प्रतिक्रीया देऊन मुद्द्याला बगल देण्यात तरी काय अर्थ आहे? असो.
आमचा दिल खुश झाला हे जास्त महत्वाचे. सुभानाल्लाह. बाकी काफरांना अल्लाह मिरच्यांची धुरी देओ हीच तमन्ना आहे. आमेन.

|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)

डॉन चे हार्दिक अभिनंदन.....
मी मिपाचा नियमित वाचक नसलो तरी अधून मधून चक्कर मारतो. मिपा वर अतिशय चांगल लेखन होत असत.
प्रतिसादाच्या निमित्ताने चांगली चर्चा पण होते. पण अलीकडे प्रत्येक वेळी चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरत आहे.
आणि मूळ लेखापासून भरकटत जाते आहे.
एक नवीन वाचक म्हणून मिपा मध्ये आलेल्या व्यक्तीला असे वाटू शकते कि हा भांडण करण्याचा आखाडा आहे .
मिपा वर कोण लेखन करत किंवा करत नाही असे किंवा अनेक इतर प्रश्न प्रत्येक वेळी कोणीही मांडेल आणि त्याला प्रत्येक वेळी सर्व जण उत्तर देत बसणार काय ?
मला वाटत ज्यांना काथ्याकुट करण्यात रस असेल तर नवीन धागा टाकून द्या आणि खेळूद्या एकमेकाशी कुस्ती ....................नाहीतर मराठी साहित्य संमेलनात पाठवा. सध्या पुण्यातच चालू आहे .
विनोदाचा भाग सोडा पण मला वाटत या गोष्टी वर विचार व्हावा......

मिपा वर उत्कृष्ट साहित्य याव आणि निखळ चर्चा व्हावी . बस एवढाच म्हणन आहे .
की मराठी माणूस पाय खेचण्यात वाकबगार आहे हे प्रत्येकवेळी दाखवत बसणार काय ?

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2010 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे

मी नी धागा टाकला पण तो चर्चेत कुठेच नाही नंतर. असो. अभिनंदनाचा धागा इथे टाकणे आवश्यक होतेच ते मी नी केले.
सखाराम गटणे चा विकास झाला पण त्याचा आत्मा हरवला. जो पुर्वी दिसत असे. आम्हाला अविकसित गटणे हा मनमोकळा व निरागस वाटत असे.काड्यांचा टेकु देउन उभ्या केलेल्या विकासा पेक्षा धडपडणारा गटणे हा मनमौजी होता.
चोट्या डॉन चे अभिनंदन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

इनोबा म्हणे's picture

27 Mar 2010 - 1:48 pm | इनोबा म्हणे

>>चोट्या डॉन चे अभिनंदन
अर्थ आवर.. अर्थ आवर

|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Mar 2010 - 9:23 am | प्रकाश घाटपांडे

टंकनभरात चोट्या डॉन झाले ते छोट्या डॉन आहे असे समजावे.
नाही तर धागा भलतीकडे जायचा. व्हतय यखांद्याबारीला आस. ल्वॉक म्हन्नार ही जानीवपुर्वक मिष्टेक केली हाय की काय? काई तरी कोट्या करायच्या आन सोताच हॅहॅहॅ करत बसायच. बाकी डॉन्याला काय फरक पडत नाय म्हना
अनर्थ सावर .. अनर्थ सावर
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2010 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

मी नी धागा टाकला पण तो चर्चेत कुठेच नाही नंतर. असो.

अगदी सहमत आहे हो पकाकाका.

ह्या धाग्यावर खरेतर लगेचच प्रतिसाद देणार होतो, पण "कंपुने कंपुतल्या लोकांच्या कौतुकासाठी काढलेला आणी प्रतिसादाने भरलेला धागा" अशा बोंबा कुणी मारु नयेत म्हणुन प्रतिसाद देणे टाळले होते. पण एकुणच काही लोकांनी मुद्दामुन धागा भरकटवण्याच्या उद्देशाने आणी मुख्य म्हणजे ज्याचे कौतुक चालु आहे तो छोटा डॉन कसा अविचारी आहे, पार्सलिटी करणार आहे, मिपा द्वेष्टा आहे हे दाखवण्याचा चालु केलेला प्रयत्न पाहुन लिहिण्यावाचुन राहावेना.

एखाद्याची रेष लहान करण्यासाठी आपली रेष मोठी करण्यापेक्षा त्या दुसर्‍या माणसाची रेष पुसू पाहणार्‍या लोकांना म्हणावे तरी काय ? "काही विशीष्ठ लोक मिपावर येत नसल्याने आता मिपा पुन्हा पहिल्यासारखे सुखी आणी सुरळीत झाले आहे" असा खरडीतुन आनंद व्यक्त करणार्‍यांनी डॉन्याने मिपावर एखादे लिखाण प्रसिद्ध न केल्याबद्दल मगरीची आसवे काढावीत हि एक गंमंतच.

असो... इनो द्या नाहीतर लाथा द्या, काही लोक बदलत नाहित हेच खरे !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Mar 2010 - 7:02 pm | ब्रिटिश टिंग्या

आमचे परममित्र श्री छोटा डॉन यांचे अभिनंदन! :)

सुरेखा पुणेकर's picture

27 Mar 2010 - 9:50 pm | सुरेखा पुणेकर

लेख लिवला भलत्याच साईटीवर, छापून आला भलतीकडच..मग हित का दिवे ओवाळाया रांग लागलीया?

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Mar 2010 - 11:12 pm | डॉ.प्रसाद दाढे

छोट्या डॉनचे हार्दिक अभिनंदन!

अनामिका's picture

29 Mar 2010 - 1:56 pm | अनामिका

डॉनराव!
मनःपुर्वक अभिनंदन!
नेहमीप्रमाणे जबरा लेखन....तुमच्या विनोदबुद्धिला सलाम
हसुन हसुन मुरकुंडी वळणे हा वाकप्रचार आज पुणेरी पाट्या वाचुन व्यक्तिशः अनुभवला... =)) =))
अवांतर-चार दिवस आंतरजालावरुन रजा घेतली होती त्याचाच परिणाम आज आपले ताजे लेखनच वाचायला मिळाले याचा आनंद जास्त आहे.......
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

महेश हतोळकर's picture

29 Mar 2010 - 9:35 am | महेश हतोळकर

मी नी धागा टाकला पण तो चर्चेत कुठेच नाही नंतर. असो.

मी हा धागा केवळ अभिनंदन करण्यासाठी टाकला आहे. माझा दुसरा कोणताही उद्देश नाही. तरी पण माझी सर्वांना विनंती आहे की डॉनचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्या अनुषांगीक प्रतीक्रियांसाठीच या धग्याच्या व्यासपीठाचा वापर व्हावा. मला स्वतःला कसल्याही अंतरजालीय ऐतीहासीक द्वंद्वामध्ये रस नाही.

डॉनचे पुन्हा एकदा अभिनंदन!

मी - महेश हतोळकर

प्रकाश घाटपांडे's picture

29 Mar 2010 - 9:46 am | प्रकाश घाटपांडे

आम्हाला हेच अभिप्रेत होते. किंबहुना हे इतरांना समजावे म्हणुनच हा प्रपंच
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भानस's picture

1 Apr 2010 - 8:31 am | भानस

छोटा डॉन यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

निखिलचं शाईपेन's picture

1 Apr 2010 - 10:09 am | निखिलचं शाईपेन

(समजा) २०१२ मध्ये सगळं जग संपणार आहे .. (नाही नाडी वाल्यांनी नाही सांगितले) तसे नसले तरी खेरीज काही काळाने या सगळया गोष्टी गौण असणारेत ...

@ ॥विकास॥
आपला (तथाकथित/मिसअंडरस्टूड खवचटपणा) काही नव्या पाट्या बनवण्यासाठी वापरा.

@ बाकी पब्लीक
लिहा लेको ... टिका झाली म्हणून ईथे लिहायचेच नाही .. हे चूकच .. कालच टा-याला हाणलाय .. मेसेंजरवर ..
आरे .. डॉन्या ..आदिती मॅडम आणि ईत्यादी ...लिहित रहा आम्ही वाचतोयच की ..

-निखिल(मिपा ईन रीड ओन्ली मोड)

II विकास II's picture

1 Apr 2010 - 11:14 am | II विकास II

(समजा) २०१२ मध्ये सगळं जग संपणार आहे .. (नाही नाडी वाल्यांनी नाही सांगितले) तसे नसले तरी खेरीज काही काळाने या सगळया गोष्टी गौण असणारेत ...

@ ॥विकास॥
आपला (तथाकथित/मिसअंडरस्टूड खवचटपणा) काही नव्या पाट्या बनवण्यासाठी वापरा.
== हे पुण्यात आल्यापासुन बदल झाला आहे, हे निश्चित

@ बाकी पब्लीक
लिहा लेको ... टिका झाली म्हणून ईथे लिहायचेच नाही .. हे चूकच .. कालच टा-याला हाणलाय .. मेसेंजरवर ..
आरे .. डॉन्या ..आदिती मॅडम आणि ईत्यादी ...लिहित रहा आम्ही वाचतोयच की ..
== लिहित रहा
-निखिल(मिपा ईन रीड ओन्ली मोड)
== सध्या काही जालमित्र आम्हाला काही संकेतस्थळांचा प्रवक्ता म्हणत असल्याने आम्ही ही आंतरजाल ईन रीड ओन्ली मोड मध्ये राहणार आहोत.
असो.