लोकशिक्षण ही गुरुकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा
हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा? हे नक्कीच विकास देशपांडे असणार त्यातुन शहर बॊस्टन म्हणल्यावर नक्कीच सकाळ ने काहितरी नावात चुक केली आहे असे वाटू लागले. पण नावात काय आहे?
मंडळी हे विठठल देशपांडे म्हणजेच आपले मिपाकर आडव्या उभ्यारेषा नसलेले विकास. उत्तम लेख सकाळने प्रिंट मिडियातील जागर मधे टाकल्या बद्दल दैनिक सकाळ चे आभार .


काका, लेख
काका, लेख तर छानच आहे. तळमळीचे लेखन आहे.
अवांतर: आजकाल बर्याच पेप्रात 'फॉरीन' चा लेखक असला की लगेचच प्रसिद्ध करतात. सकाळ तर ईमेल ने आलेले लेख असले तरी त्या त्या (फारीन) गावाचे नाव टाकत असते. काय कारण असावे? माझा कोणावरही आकस नाही पण तेथील प्रश्न ('आम्ही गरीब- आमच्या कडे दोनच चारचाकी गाड्या असतात. आम्ही इतके गरीब की आमच्याकडे तीनच नोकर आहेत' या गोष्टीसारखे) निराळे असतात. स्थानिक प्रश्नाशी त्यांची नाळ अन विचार जुळत नाहीत बर्याचदा.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
या लेखाचा संदर्भ
हा लेख लिहीण्याचे कारण, सकाळनेच केलेले खालील जाहीर आवाहन होते:
आमच्यासोबत शेअर करा, तुमचा अनुभव. तुमच्या सूचना. आमचा पत्ता webeditor@esakal.com (Subject मध्ये लिहा Pollution)
माझे काम याच विषयावर असल्याने मी त्यांना लेख पाठवला होता. व्यक्तिगत अनुभव लिहीलेला असल्याने तसेच विशिष्ठ भागातील माहीतीही त्यात असल्याने त्यात गाव घातले गेले असावे.
असे लेख, माहीती, अनुभव यांची देवाणघेवाण विकसीत राष्ट्रातही होत असते. अनेकदा पश्चिम युरोपातील पर्यावरणावरील अनुभव अमेरिकेत बदल करण्यासाठी सांगितले जातात. त्यात काहींना, "तुम्ही सांगणारे कोण?" असे वाटते तर काहींना त्यातून स्थानीक प्रश्न सोडवण्यासाठीच्या कल्पना सुचतात.
इलेक्ट्रॉनिक्स कचर्याच्या प्रश्नाबाबत असेच थोडेफार झाले आहे. युरोपात असलेली उत्पादक/विक्रेत्यावरची हा कचरा परत घेण्याची जबाबदारी येथे सांगितलेली अजूनही पूर्ण पटत नाही आहे, पण मिनिसोटा राज्याने ती घेतली. तसेच सरकारे करत नाहीत आणि जनतेचा वाढत असणारा दबाव पाहून स्टेपल्स, बेस्टबाय, सारखे उद्योग यात आपणहून काहीतरी करायला सुरवात करू लागले आहेत.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही.
विकास सर,
विकास सर, माझा तुमच्यावर अन तूमच्या लिखाणावर काहीच आक्षेप नाही हो. माझे केवळ निरीक्षण लिहीले. तुमचे लिखाण नेहमीच चांगले आहे. मग ते भारतीय भुमीतले असो की तिकडचे.
तुमच्याबद्दल आदर आहेच. सदर लेखाने तो अधिकच वृद्धींगत झालेला आहे.
तरीही असे राहून राहून वाटते की केवळ तिकडच्या गावाचे नाव लिहीले की लेखाला वजन येवून लेख चटकन खिळे जुळवण्याच्या विभागात जातो.
मनातला राग काढून टाका. माझे बोलणे व्यक्तिश: लावून घेवू नका.

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
आत्ताच लेख
आत्ताच लेख वाचला. मुद्देसूद झालाय, परिणामकारकही! आपले अभिनंदन! लेखातला शेवटचा परिच्छेद हा खरा आपल्या सगळ्यांसाठी आहे. देश वेगवेगळे असतील पण मानसिकता बदलणे हे मुख्य काम आहे. साधारण दोन वर्षांपासून वेगवेगळ्या दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी पुनर्वापराच्या पिशव्या वापरण्याचे आवाहन करायला सुरुवात झाली असावी (नक्की आठवत नाही). बर्याच दुकानांनी त्यांच्या दुकानाचे नाव छापलेल्या पिशव्या एकेक डॉलरला विक्रीस ठेवायला सुरुवात केली आणि बघताबघता बरेच पब्लीक रियुजेबल पिशव्या वापरू लगलयं. अजूनही हे प्रमाण वाढायला हवं. मीही आजकाल घरातल्या कापडी पिशव्या गाडीत ठेवते. कधी विसरते तर कधी दुकानात जाताना घेउन जाते. पाषाणभेद साहेब म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक देशातील समस्या व निराकरणाच्या पद्धती असतील वेगवेगळ्या पण आपल्या घरातील कचरा हा आपल्या घरातील कचर्याच्या टोपलीतच टाकायला सुरुवात केली तरी खूप मोठे काम होइल असे वाटते. बाकी सांडपाणी, कारखान्यातील प्रदुषीत पाणी हे मोठे विषय आहेत.
रेवती
रेवती
छान माहिती - पुढील अभ्यासाबाबतही लिहावे
समरव्हिल येथील प्रयोगाची माहिती उत्तम. विशेष म्हणजे तो चालू राहिला.
माहिती मिळाल्यानंतर लोकांनी हळूहळू स्वच्छता वाढवली. याबद्दल आणखी अभ्यास झाला तर उत्तम. उदाहरणार्थ, (जर सम्रव्हिलमध्ये मोठे औद्योगिक प्रदूषण करणारे कारखाने/ सेते असल्यास...) प्रदूषणकर्त्यांवर दबाब आला का? किंवा घरगुती सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी शुद्ध करण्याबाबत शहरातील लोकांनी काय केले? यात काही त्रास झाल्यास अडचणी कशा सोडवल्या गेल्या? यातून अन्य गावांना, छोट्या शहरांना काही मार्गदर्शन मिळेल.
चांगला आणि अनुकरणीय अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
बोलावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
पण
करावा विकास, जीवभावे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
(विषय दिलेला नाही)
:)
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
चांगला लेख
श्री घाटपांडे, श्री विकास यांच्या चांगल्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. श्री विकास यांनी या प्रयोगाबाबत मिपावर विस्तृतपणे लिहावे म्हणजे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ, स्थानिक लोक तसेच सरकार यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर प्रश्न कसे सोडवता येतील याचा वस्तुपाठ मिळेल.