Skip to main content

विक्रमादित्याचा पोवाडा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/02/2010 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला.... हो ओ SSSSSSSS पण महाराजा... शेर आखीर शेर होता है...... त्यानं सोडला नाही ठाव..SSS, सोसले..., गुमा SSS न सारे घाव SSS.... लावला नेम, पकडली येळ ..... अन डाव कीं हो साधला ..... जी ई ई SSSSSSS सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न ... राजानं यवनांशी दावा कीं हो मांडला..SSSSS रणभेरी वाजलेली आहे, गनिम माजलेला आहे.... पहिल्याच घावात राजाचा सेनापती कीं हो पाडला.... शत्रुसैन्यात आनंदी आनंद झालेला आहे.... राजाच्या सैन्यात हाहाकार... सैन्य खचणार कीं काय? विक्रमादित्यानं..., आधार...., त्याला दिला...... सैन्याचे केले सांत्वन आन धीर कीं हो दिला.... परजली बॅट..., गनिमाला चाप की हो लावला ..... जी ई ई ई SSSSS महावीराचा पाहूनी रुबाब... गनिम झाला हैराण..., परेशान..., त्याने पॉवर प्ले चा व्युह कीं लावला... पण फिकर नसे विक्रमादित्याला... मास्टर ब्लास्टरनं इंगा दावला.. जी ई ई SSSSSSSSS शत्रुचे उतरले कितीक वीर, महावीर रणांगणात..SSSS वापरले स्लेजिंगचे ब्रह्मास्त्र राजाच्या विरोधात.... सोडली लाज सारी आज रणांगणात हो हो ओ SSSSS सोडला नाही भाद्दराला नमवण्याचा.... एकही प्रयत्न...SSSS पण पठ्ठ्याने डाव नाही सोडला जी जी रं जी ई ई SSSSS शत्रुच्या डावपेचांची वाट लागलेली आहे.. गनिमाला पळता भुई थोडी झालेली आहे.. तशात राजा स्वतः मैदानात उतरलेला आहे... दमलेल्या भाद्दराला आराम की हो दिला... अंगावर घेवून गनिमाला.., राजाने डाव जिंकला.... जी ई ई SSSSSS तर मंडळी अशा रितीने ... गनिमाने माथा कीं हो टेकला SSSSSS हो ओ SSSSS. म्हणुन म्हणतो... बोला विक्रमादित्य सच्चीनानंद महाराज की SSSS जय SSSS ! एक वेडा सचीनभक्त !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1297
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया