Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Sun, 02/14/2010 - 23:01
  • Log in or register to post comments
  • 12550 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Mon, 02/15/2010 - 00:43

Permalink

व्वा !!

व्वा !! गाण्यांमुळे लेख प्रभावी झाला आहे :)
आता मात्र हळूहळू त्या गेटवेच्या गर्दीत मला स्वत:ला जरा एकटं वाटू लागलं.. तशी गेटवेला वर्दळ होती, प्रेमीयुगुलांची गर्दी होती पण मी मात्र एकटा पडत चाललो होतो..
आम्ही शिंगल असताना ह्या भावनेचा भरपूर अनुभव घेतलेला आहे ;) - (डबल) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 02/15/2010 - 03:50

Permalink

तात्या

तात्या असं चटका लावणारं का लिहीता हो? :( :( :( ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Mon, 02/15/2010 - 07:47

Permalink

मस्तच!

जुन्या गाण्यांची खुमारी नेहमीच नवी, टवटवीत. चीरतारुण्याचे रहस्य.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Mon, 02/15/2010 - 10:22

Permalink

मधुबाला...

आणि लता ह्यांची आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद. मधुबाला आणी लता ह्यांच्या सोहळ्यातील मला अजून काही आठवले, ते इथे देत आहे.. [अनिल बिश्वास] *वो दिन कहाँ गये बता? *मोसे रूठ गया मोरा साँवरिया *बेईमान तोरे नैनवा नींदिया न आये ******** [सज्जाद हुसैन] * वो रात दिन, वो शाम की गुजरी हुई कहाँनिया *वो तो चले गये ऐ दिल.. ******** [मदन मोहन] *न हंसो हम पे, जमाने के है ठुकराये हुवे.. *सपने ने सजन से दो बातें ******* [नौशाद] *बेक़स पे करम कीजिये...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 02/15/2010 - 11:04

In reply to मधुबाला... by प्रदीप

Permalink

धन्यवाद

धन्यवाद प्रदीपराव.. बेक़स पे करम कीजिये... हे माझं अत्यंत आवडतं गाणं. प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Mon, 02/15/2010 - 16:33

In reply to धन्यवाद by विसोबा खेचर

Permalink

छान

छान लेख. बेकसपे करम हे माझंही अतीच आवडतं गाणं आहे. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Mon, 02/15/2010 - 11:58

Permalink

तात्या असं

तात्या असं चटका लावणारं का लिहीता हो? पण बायकांच्या आड्यंन्सला रडवायला ते पोर मारुनबिरुन टाकू नका हां! अरे, मोठ्या माणसांना मारा की. हे बघ, ते हिरॉइनचं बाप भटजी असतंय की नाही? म्हातारंच असणार की ते! मारा की त्याला! पोरं मारुन, बायका रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाप की हो ते! थू! सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 02/15/2010 - 14:28

In reply to तात्या असं by सन्जोप राव

Permalink

संजोपा,

संजोपा, आपलं काय ठरलंय? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! ठरलंय की नाही? :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Tue, 02/16/2010 - 05:52

In reply to संजोपा, by विसोबा खेचर

Permalink

अर्रर्र...

विसरलो होतो. एक डाव मापी कर हां सायबा.. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 02/16/2010 - 07:47

In reply to अर्रर्र... by सन्जोप राव

Permalink

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by उदय सप्रे on Mon, 02/15/2010 - 14:45

Permalink

तात्या....

मस्तच ! परवा अशोक हांडे यांचा "मधुरबाला' पाहिला, गडकरी ला ! खरं सांगू का, आपल्याला नाही झेपला बॉ ! अपेक्षा खूप होत्या पण चुराडा झाला ! नाही म्हणायला 'मुगल्-ए-आझम' गाण्यांनी जरा रंगत आणली , पण बरसात की रात एकदम कंडम झालं ! अशोक हांडे पण निवेदनात अतोनात चुका करत होते , हां पण एकच मुदा मस्त ! वर सिलिंगवर "प्यार किया तो डरना क्या" चे ते मधूचं असंख्य काचांमधलं रूप दाखवलं ! (सालं ते पण गडकरी च्या "नागडं"करी सिलिंग्मुळे रद्दी दिसलं ! एखाद्या ठिकाणाचा राडा कसा करायचा हे ह्या ठाणे प्रशासनाकडून शिकावं राव ! मधूच्या आठवणी जाग्या झाल्या....न भूतो न भविष्यती ! आणि आमचीच एक कविता आठवली : "घडवल्यावर जिला , त्याला वाटलं, "आपली बाकीची सर्वच निर्मिती नगण्य !" अशी ही एकच मधुबाला , म्हणजेच मदिरेशिवाय धुन्दावणारं बावनकशी ला वण्य
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशु on Mon, 02/15/2010 - 16:44

Permalink

मधुबाला ती मधुबाला

बहुतेक पाडगावकरांनी म्हटलयं.... कितिक आल्या कितिक गेल्या.. पण मधुबाला ती मधुबाला
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 02/15/2010 - 18:30

Permalink

गाण्यांनी

गाण्यांनी मजा आणली तात्या. आणि सप्रे साहेब.. मदिरेशिवाय धुन्दावणारं बावनकशी ला वण्य वाह, क्या केहने!! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 02/15/2010 - 18:59

Permalink

का त्रास

का त्रास देताय तात्या? बाकी लेख अगदी चटका लावणारा झालाय हे सांगायला नकोच. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Mon, 02/15/2010 - 20:17

Permalink

तात्या!नेह

तात्या! नेहमीप्रमाणे अतिसुंदर लिखाण्.....पण या लि़खाणाने आमच्या देखिल काही जुन्या स्मृती चाळवल्या.........आणि लावण्यवती मधुबालाच हे http://www.youtube.com/watch?v=-DObsicnD-k&feature=related"दो घडी वो जो पास आ बैठे" गाण जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेल. मधुबालाचा सर्वागसुंदर अभिनय आणि लताजींचा आवाज या मिलापाला तोड नाही.... सौदर्याच लेण आसपास वावरत होत त्यामुळे ठोकळा असणारे भारतभुषण सुद्धा अंमळ अभिनय करु शकले असावे बहुदा "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 02/16/2010 - 10:06

Permalink

काही विसरलात...

दोष नाही, तिच्या इतक्या अदांमधल्या किती लक्षात ठेवणार आणि इतक्या छोट्या जागेत किती लिहीणार... 'दो घडी वो जो पास आ बैठे' मध्ये ती जी निरागस नटखट दिसली आहे त्याला तोड नाही. एक तो ठोकळा भारत भुषण सहन करावा लागतो... चलती का नाम गाडी मधल्या 'लेकीन पेहेले देदो मेरा..' मध्ये ती बेफाम दिसलेली आहे... 'आईये मेहेरबान...' म्हणताना ती जे नजरेने दाखवते त्यासाठी झीनत अमानला बरंच काही करावं लागतं (अर्थात त्याला आमची ना नाही...) 'जानु जानु रे चुपके कौन आया तेरे अंगना' हेही तिचं गोड गाणं... मी होस्टेलमध्ये होतो तेव्हा माझ्या रूमच्या भिंतीवर मी एक पाच फूट बाय सहा फूट एवढा तिचा चेहेरा स्केच केला होता. तीन वर्ष त्या हास्याने माझी साथ केली.. त्यानंतर पंधरा वर्षं अनेक रंगरंगोट्यातून बचावून इतरांना साथ दिली... तिच्यावर जीव कुर्बान...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/16/2010 - 10:26

Permalink

मस्त

सुंदर लेख आणि गाण्यांचे दुवे प्रदीपरावांनी पण मस्त दुवे दिले आहेत. दोघांचेही आभार :) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 02/16/2010 - 10:49

Permalink

मस्त

मस्त ! तात्याश्टाईल लिखाण वाचायला बर्‍याच दिसांनी मिळाले, और भी आने दो !
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 02/16/2010 - 10:50

Permalink

मस्त

मस्त ! तात्याश्टाईल लिखाण वाचायला बर्‍याच दिसांनी मिळाले, और भी आने दो !
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 02/16/2010 - 15:17

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Tue, 02/16/2010 - 21:17

Permalink

छान आहे....

छान आहे.... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 02/17/2010 - 12:16

Permalink

चटका लावणारे लिखाण !

तात्या, आमच्या जवळच रहाणारी भाभी पण मधुबाला सारखीच दिसते... Infact त्यांच्या घरातील सर्वच स्त्रिया खुपच सुंदर आहेत ... पण सगळेच स्रिया बुरख्यात असल्याने आम्हीच फक्त त्यांना घरी गेल्यावर पाहू शकतो ....ती जिवघेणी अदा आम्ही रोज अनुभवतो आज घरी गेल्यावर काहीतरी कारण काढून भाभीं कडे जाणार फक्त तिचे ते स्मित हास्य अनुभवायला :H आम्ही मुली असूनही त्यांच्यावर फिदा ... मग मुलांची काय गत ? =(( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Wed, 02/17/2010 - 12:35

Permalink

मस्तं.

फार सुंदर लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by ललिता on Wed, 02/17/2010 - 14:40

Permalink

फक्त मधुबालाच!

अगदी वाहीदा, मधुबाला ही एकच स्त्री जगात असेल जिच्या सौंदर्याबद्दल तमाम स्त्रीवर्गात एकमत आहे! बाकी बायका दुसर्‍या बाईची अशी सहजा सहजी स्तुती करत नसतात... मधुबाला एक सुंदर अपवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by वर्षा म्हसकर-नायर on Wed, 02/17/2010 - 15:47

Permalink

लेख आवडला.

तात्या, लेख खुपच आवडला. एकदम स्वप्निल. शांता शेळकेंच्या गाण्यातील ओळी आठविल्या. 'स्वप्नामधिल गावा, स्वप्नामधुन जावे स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा... ' एखादा जुना black and white पिक्चर बघत आहोत असे वाटले. कल्पना, मधुबालाचे वर्णन सर्वच आवडले. जीयो.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 02/17/2010 - 16:06

Permalink

शापित

शापित यक्षिणीला त्रिवार मुजरा !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 02/17/2010 - 16:18

Permalink

मस्त मस्त मस्त...

लेख आवडला.. जगात फार कमी स्त्रीया अशा आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्या‍विषयी मला आदर वाटतो. (म्हणजे मनात भलते सलते विचार येत नाहीत). मधुबालेच्या सौंदर्याचे हेच वैशिष्ठ आहे. मदिरेशिवाय धुन्दावणारं बावनकशी लावण्य हे एकदम पटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 02/17/2010 - 16:18

Permalink

मस्त मस्त मस्त...

लेख आवडला.. जगात फार कमी स्त्रीया अशा आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्या‍विषयी मला आदर वाटतो. (म्हणजे मनात भलते सलते विचार येत नाहीत). मधुबालेच्या सौंदर्याचे हेच वैशिष्ठ आहे. मदिरेशिवाय धुन्दावणारं बावनकशी लावण्य हे एकदम पटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by वर्षा म्हसकर-नायर on Wed, 02/17/2010 - 19:06

Permalink

अजुन एक

अजुन एक मधुबालाच्या बाबतीत सांगावसे वाटते ते हे कि त्याकाळी कॅमेरामनने अथवा दिग्दर्शकाने खुप सुरेख पद्धतीने तीच्या अदा कॅमेर्‍यात टिपल्या. पुर्वीच्या गाण्यांचे picturization, चित्रीकरण किती सुरेख असायचे. नाहीतर आता... एका सेकंदाला ५० फ्रेम्स बदलतात. दृष्टीला पडुन मेंदुत रजिस्टर व्हायच्या आत फ्रेम बदललेली असते. आणि गाणी म्हणजे कवायती. जाउ दे. शिवाय ब्लॅक अ‍ॅंड व्हाईटची मजाच काही और असते.n
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com