गोभी मंचुरीयन - गोभी ६५

गणपा's picture
गणपा in पाककृती
3 Feb 2010 - 8:32 am

काल अंगारिका संकष्टी चतुर्थी होती.
ऑफिस मध्ये गेले २-४ दिवस बरच काम होत. त्यामुळे लंच टाइम मध्ये घरी येउन साबुडाण्याची खिचडी वगैरे करायला फुरसत नव्हती.
त्यामुळे काल निर्जळी उपवासाच पुण्य आयतच पदरात पडल.
संध्याकाळी घरात पाऊल ठेवल्यावर पोटातल्या कावळ्यांनी आवाज दिला. देवाला नैवेद्य तर ठेवायचा पण नेहमी सारख साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत. त्यामुळे पटकन होणार चायनीज करायच ठरवल. म्हटल तेवढच देवालापण जरा चेंज ;)
फ्रिज मधल्या कच्च्या मालाचा अंदाज घेतला. जास्त भाज्या नव्हत्या पण फ्लॉवर, भोपळी मिरची, पाती कांदा दिसला. त्यावरच वेळ मारुन नेण्याच ठरवल.

गोभी मंचुरीयन
साहित्यः


१ कांदा लांब कापलेला.
१ भोपळी मिरची लांब उभी कापलेली.
२ हिरव्या मिरच्या बारीक कापुन.
३-४ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
पातीकांदा चिरुन (असल्यास).
फ्लॉवर लहान तुकडे करुन.
२ चमचे मैदा
२ चमचे कॉन फ्लॉवर
सोया सॉस, चीली सॉस, टोमॅटो सॉस.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.

कृती:


एका भांड्यात पाणी तापवुन घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करुन मग त्यात कापलेला फ्लॉवर ५ मिनिटं टाकुन ठेवावा.
नंतर बाहेर काढुन वेगळा ठेवावा.


एका भांड्यात थोड तेल तापवुन त्यात लसुण हिरवी मिरची परतुन घ्यावी.


मग त्यात थोडा सोया सॉस, टोमॅटो सॉस, चीली सॉस टाकुन मोठ्या आचेवर परतुन घ्याव.


नंतर त्यात कांदा, पाती कांदा, भोपळी मिरची टाकुन परतुन घ्याव. चवीनुसार मीठ टाकाव. आच मध्यम करावी.


ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी त्या प्रमाणात पाणी टाकावे.
एक उकळी आली की मग त्यात १-२ चमचे कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन टाकावे.
१ मिनिटा नंतर आच बंद करावी.


एका भांड्यात २ चमचे मैदा, १ चमचा कॉन फ्लॉवर मीठ एकत्र करुन घ्यावे.


गरम पाण्यातुन बाहेर काढुन ठेवलेले फ्लॉवरचे तुकडे या मिश्रणात घोळवुन घ्यावे.
शक्यतो पाणी टाकु नये. अगदिच कोरड वाटल तर पाण्याचा एक हबका मारावा.


हे पिठात घोळवेलेले तुकडे गरम तेलात सोनेरी रंग येइस्तो खरपुस तळुन घ्यावे.

वाढायच्या काही क्षणांपुर्वी वर तयार केलेल्या ग्रेव्हीत हे तळलेले फ्लॉवर चे तुकडे आयत्यावेळी घालावे आणि गरमा गरम सर्व्ह कराव.

***********************************************************************************

गोभी-६५
साहित्यः


१ लहान कांदा बारीक चौकोनी कापुन.
फ्लॉवरचे लहान तुकडे.
कढीपत्ता.
चवी नुसार मीठ.
२ चमचे मैदा.
१ चमचा कॉन फ्लॉवर
१ चमचा लाल तिखट.
तंदुर रंग (ऑपशनल)

कृती:


एका भांड्यात पाणी तापवुन घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करुन मग त्यात कापलेला फ्लॉवर ५ मिनिटं टाकुन ठेवावा.
नंतर बाहेर काढुन वेगळा ठेवावा. (वरचीच स्टेप)


एका भांड्यात मैदा,कॉन फ्लॉवर, मीठ,लाल तिखट, रंग एकत्र करुन थोड थोड पाणी टाकत भजी सारखे पीठ तयार करावे.


फ्लॉवरचे तुकडे त्या मिश्रणात घोळवुन गरम तेलात तळुन घावे.


फ्राईंग पॅन मध्ये थोड्या तेलावर कांदा परतुन घ्यावा. कढीपत्ता टाकावा.
१/२ चमचा लाल तिखट टाकुन परतुन घ्याव.
त्यात वर तळलेले फ्लॉवरचे तुकडे टाकुन मोठ्या आचेवर १/२ मिनिट परतुन घ्याव.


गरमा गरम वाढावे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

प्रतिक्रिया

बट्ट्याबोळ's picture

3 Feb 2010 - 8:48 am | बट्ट्याबोळ

काटा आला जिभेवर !!

चतुरंग's picture

3 Feb 2010 - 8:48 am | चतुरंग

मांचूरियाचं तिकिट काढून टाका रे कोणीतरी चटकन, वाटलं तर मी पैशे देतो (बिका आणि श्रामो लगेच होतील भागीदार त्यामुळे अजिबातच काळजी नाहीये!;) )
बैस तिथे थंडीत मांचूरियन करत आणि खात म्हणावं! X(

(गणा, गोभी मांचूरियनची ग्रेवी जरा पातळ वाटती आहे का की अशीच असते? मला नीट आठवत नाहीये, खूप दिवस झाले खाऊन..)

चतुरंग

आशिष सुर्वे's picture

3 Feb 2010 - 9:47 am | आशिष सुर्वे

माझ्या तर्फे आणि देवातर्फे आभार (देवाला एक 'चेंज्ड' नैवेद्य मिळाला म्हणून..)

गणपा, 'हॅम'च्या तिथल्या काही पाककृती इथे दे ना..

======================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!

आपल्याला खुप आवडते गोबी माचुंरियन. गोबी ६५ पण करुन बघायला पाहिजे.
वेताळ

ऋषिकेश's picture

3 Feb 2010 - 10:43 am | ऋषिकेश

प्रलय आला प्रलय !!!.......जिभेवर प्रलय आलाय!
मस्त!!!!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

अश्विनीका's picture

3 Feb 2010 - 1:48 pm | अश्विनीका

मस्त. फोटो पण छान आले आहेत.
>>साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत
बापरे . त्राण नव्हतं तरी भरपूर मेहनत घेऊन केलंत की . अशावेळी (त्राण नसताना) आमच्या घरात मॅगी नूडल्स वर निभावून नेले जाते.

- अश्विनी

मेघवेडा's picture

3 Feb 2010 - 4:24 pm | मेघवेडा

फर्स्ट क्लास गणपा!! मस्तच!!!

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

स्वाती२'s picture

3 Feb 2010 - 5:05 pm | स्वाती२

मस्त!
>>नेहमी सारख साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत.
अरे देवा! या रेटने साग्रसंगीत ताटाची कल्पना करायचे धाडसही माझ्यात नाही. मी असे मांचुरियन वगैरे केल्यावर दमायला झालं म्हणून आरडा ओरडा करते. त्राण नसले की देवाला दुध-साखर आणि बाकिच्यांना दुध-सिरिअल!

शुचि's picture

3 Feb 2010 - 6:04 pm | शुचि

अंगारकी च्या दिवशी अशी मस्त लाल बुन्द भाजी ..... वाह!!! समयोचितच की.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

प्राजु's picture

3 Feb 2010 - 8:54 pm | प्राजु

अवघड आहे बाबा आमचं!!
या गणपाला आवरा कोणीतरी आता!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

विंजिनेर's picture

3 Feb 2010 - 9:05 pm | विंजिनेर

ए बाबाऽऽ जा पाहू इथून तू(नाहीतर त्यापेक्षा इथे ये :) शिक्षा म्हणून आधी तुला हे असलं करायला लावीन आणि मग बाहेर पडलेल्या -१३डि. सें च्या थंडीत उभा करीन... ही हॉ हॉ हॉ...)... अत्याचारी माणूस नुसता :(

भडकमकर मास्तर's picture

4 Feb 2010 - 9:49 am | भडकमकर मास्तर

मस्त पाकृ
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

खादाड's picture

4 Feb 2010 - 4:12 pm | खादाड

veg चायनिझ मस्त दिसतय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2010 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त पाकृती गणपासेठ...!

-दिलीप बिरुटे