✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बहिणाबाई- एक महान कवियत्री

स
सुनिल पाटकर यांनी
Sat, 12/05/2009 - 22:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9261 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

आवडले लेखन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/05/2009 - 23:02 नवीन
जीवनाचं अगाध तत्त्वज्ञान आपल्या सहज सुंदर कविता ,गाणी ओवी,म्हणीतून मांडणारी ही महान कवियत्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृध्दी पुढ्च्या काळातही अबाधित राहिल अशीच आहे. अगदी खरं आहे. लेख आवडला ! बहिणाबाईंची एक म्हण: मानसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेख

प्रभो
Sat, 12/05/2009 - 23:07 नवीन
लेख आवडला --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

प्रतिभावंत कवयित्री

धनंजय
Sun, 12/06/2009 - 00:01 नवीन
या प्रतिभावंत कवयित्रीच्या कवितांची आठवण करून दिलीत - सुंदर रसग्रहण.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख.

स्वाती२
Sun, 12/06/2009 - 00:59 नवीन
सुरेख लेख.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

क्रान्ति
Sun, 12/06/2009 - 11:03 नवीन
मळा, मोट,पाणी चूल, तवा शेतीची कामे,घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी सार्‍या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खूलं झालेलं आहे.तरिही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परन्तु जीवनात जे दिसलं,जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातुन बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली. १००% सहमत. अतिशय मर्मग्राही लेख. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

मन जह्यरी

शुचि
Mon, 04/12/2010 - 05:56 नवीन
मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर अरे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर सुंदर!!!!!!!!!!!!!!!! लेख आवडला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments

जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल

वाहीदा
Mon, 04/12/2010 - 15:00 नवीन
'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे ’' .. अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. बहिणाबाईंच्या कवितेला एक खास रंग आहे. मातीचा, पानाफुलांचा, ग्रामीण जीवनाचा, खानदेशी वऱ्हाडी भाषेचा गंध आहे. कुठल्याही पढीकपणाचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. धरणी, वारा, आभाळ, पाऊस, ऊन यांच्या आधाराने वाढलेली बी, बियाणे, मोट, नाडा, शेत, खळे, बैल, नांगर, वखर, बोरी, बाभळी, निंबोणी, चूल, तवा, भाकरी, भाजी, विस्तव, फुंकणी, पाखरे, झाडे, वेली, देव... या साऱ्यांशी रक्ताच्या, हाडामांसाच्या नात्याने बांधलेली त्यांच्या अस्सल देशी कविता !! आधुनिक जीवन जाणिवांचा, यंत्रादी साधनांचा तिला स्पर्शही नाही. बहिणाबाईंनी प्रेमकवितेची एक ओळही लिहिली नाही; पण जे लिहिले, ते अतिशय मौलिक लिहिले लिहीता न येणार्‍या बहिणाबाई 'अहिराणी' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. "कष्टातच देव पाहिला पाहिजे,' हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांच्या कविता इतक्या श्रीमंत, आशयगर्भ, सफाईदार आणि मधुर आहेत, की भल्याभल्यांनी तोंडात बोट घालावी. देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत! देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं! मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना, मन केवढं केवढं? आभायात बी मायेना अप्रतिम !! बहिणाबाईंविषयी "पुलं'नी म्हटलं आहे, की "कवितेचं दळण अनेकांनी मांडलं; पण सुख- दुःखाच्या जात्यात स्वतःचं जीवन भरडलं जात असताना, त्या श्रमांचं सामवेद करून गाणारी बहिणाबाई एखादीच." ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

वाहीदा छान

शुचि
Mon, 04/12/2010 - 19:49 नवीन
वाहीदा छान प्रतिसाद दिलास ग :) .... केवढी मोलाची भर घातलीस ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

सहमत...

मनिष
गुरुवार, 04/15/2010 - 22:06 नवीन
वहिदा....उत्तम प्रतिसाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

छान!

स्वाती दिनेश
Mon, 04/12/2010 - 16:42 नवीन
लेख आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments

बहिणाबाईं

अरुंधती
Mon, 04/12/2010 - 16:48 नवीन
बहिणाबाईंचे अभंग, गाणी पुढील साईटसवर उपलब्ध आहेत. http://www.aathavanitli-gani.com/Lists/Sant%20Details/Bahinabai.htm http://www.khapre.org/portal/url/keywords/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88.%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80.aspx ''अरे संसार संसार'' गाणे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात यूट्यूबवर ऐका : http://www.youtube.com/watch?v=9Pr21rLr90o&feature=PlayList&p=B60ED1E6B738D418&playnext_from=PL&playnext=1&index=9 अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खूप सुंदर

राघव
Tue, 04/13/2010 - 09:33 नवीन
खूप सुंदर लेख. :) मला वाटतं त्या काळी बर्‍याच माईंना जात्यावर ओव्या म्हणायची सवय होती. आणिकही काही बहिणाबाई असतील.. फक्त आपल्याला माहित नाहीत. मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर अरे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना, मन केवढं केवढं? आभायात बी मायेना किती सहज, उत्स्फूर्त पण तेवढंच गहिरं लिहिलेलं.. खूप सुंदर. बहिणाबाईंना दंडवत! राघव
  • Log in or register to post comments

सुरेख लेख !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/15/2010 - 12:29 नवीन
सुरेख लेख ! खरोखर बहिणाबाई म्हणजे विदर्भाला पडलेलं एक नितांत सुंदर स्वप्न होतं. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

अतुल पेठे

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/15/2010 - 15:33 नवीन
अतुल पेठेंचा बहिणाबाईंच्या जीवनावर दिग्दर्शित एक उत्त्तम लघुपट आहे. मला, मुक्त सुनीत व बिका ला त्यांनी त्याची प्रत भेट दिली होती प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख !

मितभाषी
गुरुवार, 04/15/2010 - 19:00 नवीन
सुरेख लेख ! खरोखर बहिणाबाई म्हणजे विदर्भाला पडलेलं एक नितांत सुंदर स्वप्न होतं. =)) :)] :T ~X( X( इशाल्भौ काय हे??????????? ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा