(नसतेस घरी तू जेव्हा )
आमची प्रेरणा संदिप खरे यांची अप्रतिम कविता नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन् एकच गलका होतो
नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन् पती बोलका होतो
येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो
तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो
तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो
ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती




हा हा
वा! क्या बात है!
केशवसुमार,
आज घरी कोणी दिसत नाहीये!
) एकामागून एक धोबीपछाड सुरु आहेत म्हणून विचारतोय!
हायक्लास विडंबन!!
चतुरंग
भन्नाट,रे
भन्नाट,रे केश्या....
नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन् एकच गलका होतो
लईच जबरा...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)
क्या बात है !!!!!!
तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो
आहाहा ! अती सुंदर !!
- सर्किट
काय केशव,
काय केशव, आज एकदम धडाधड विडंबने येत आहेत...
खरं सांगायचं तर मला ते "नसतेस घरी तू जेव्हा" इतके नाही आवडत. पण विडंबन एकदम जबरा.. हेच जास्ती आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
वा वा!
तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो
वा वा! क्या बात है...
अवांतर -
मी पुन्हा सात्त्विक होतो
च्या ऐवजी,
पुन्हा मी सात्विक होतो
असे चालेल का?
आपला
(कवितेतलं फारसं काही न समजणारा) तात्या.
चालीत
म्हणताना
'मी पुन्हा सात्त्विक होतो' हे जस्त चपखल बसते आहे..
आपला
(गाण्यातल फारस काही न समजणारा)केशवसुमार
ओक्के..
बॉस.
वा वा केशवराव
वा वा केशवराव,
अप्रतिम विडंबन . झकास . मजा आली.
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
वा, सेठ वा
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले एकापेक्षा एक सरस विडंबने वाचायला मिळत आहेत, आमची सुटी कारणी लागली
नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन् एकच गलका होतो
आपल्या विडंबनाची एकदा सुरुवात जोरदार झाली की, उत्तरार्ध, आणि शेवट लाजवाब होतो, हा आमचा अनुभव आहे.
सारांश, विडंबन आवडले
लाजवाब
मस्त
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार
माझ्या
माझ्या मते, जर हे विडम्बन खुद्द सन्दीप खरेनीदेखील वाचले, तर त्यानाही हसू आवरणार नाही.
फार झक्कास जमलय! लगे रहो!
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
खत्राड
जबराट विडंबन आहे हे
आहाहाsss
खल्लास्स्स .... एक से बढकर एक.
जियो केशवराव...
सही
सही जमलंय विडंबन.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
मस्त विडंबन झाले आहे.
खासच....
सुंदर
झकास विडंबन आचार्य. अत्यंत आवडले.
(हसरा) आजानुकर्ण
लई भारी
फुल्टु मजा आलीव.

बेष्ट
बेष्टच एका वर्षानी जालिंदरबाबाच्या कृपने पुन्हा काव्याचा आनंद घेता आला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
झकासच !
झकासच ! एकदम एव्हरग्रिन विडंबन.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
१ नंबर....
जय हो...........
वाह.......
एकदम नादखुळा..............
वाह.......
एकदम नादखुळा..............
वाह.......
एकदम नादखुळा..............
अप्रतिम
एकदम मस्त विडंबन
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
ओरिजिनल
ओरिजिनल गाण खूप आवडत.
विडंबने फारशी आवडत नाहित. पण हे आवडल.
मीनल.
लय भारी
लय भारी विडंबन केशवसुमार !!!!!
येताच
येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो
हा.हा.हा.... करेक्ट.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
एकदम
उच्च विडंबन.
लगे रहो
अभिज्ञ.
वा झकास. प्रत्येक ...
व्रात्य नवर्याच्या सोनेरी अनुभवाची रम्य आठवण ताजी केली.
पण खिडकीत उभें राहून धूम्रपान केलें तर लक्षांत ठेवा पडद्यांना धूम्रकाष्ठाचा - सिगारेटचा वास येतो. पण मूळ कविता अग्निकोल्ह्यावर दिसत नाहीं.
सुधीर कांदळकर.
बेफाम!
बेफाम, फण्टास्टिक, लै भारी !!!
सुंदर !!!!
सुंदर !!!!
अत्र्यांनंतर तुम्हीच !!!
जबरदस्त!
चरणांवर तव पडतो.....! हा हा हा. येथ शरण आलेया काय मरण असे?