मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट्रीट्मेंट

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
You need to go out and have blast mate. You are currently drowning in cesspool of self pity mate. 'सावल्यांच्या झळा या मालिकेतल्या कथा नायकाला त्याच्या कंपनीच्या सायकीऍट्रीस्ट ने दिलेला सल्ला. ऑगस्ट २००८ मधे ह्या माझ्या मित्राला भुतकाळाचा खुपच त्रास व्हायला लागला. त्याचा आउट्पुट वर परिणाम झाला. 'संवेदनशील' पोस्ट वर असलेल्या माणसाचे सुरु झालेले हाल कंपनीला परवडणारे नव्हते. But to do that you need to connect with somebody positive from your past. Without that even I can not help you mate. ऑस्ट्रेलीयन असलेल्या ह्या डॉक्टरने सोशल साईट चे रेकमेंडेशन सुद्धा केले. कुठेतरी कळाले मिसळ पाव बद्दल. वाचनमात्र आहे इतके दिवस हा माझा मित्र. माझे लिखाण वाचत होता. पण संपर्क करायला त्याला धीर होत नव्हता. एकदा मी चुकुन खरडी मधे लिहीलेला माझा मोबाईल नंबर वाचण्यात आला त्याच्या. त्रास सहन होइनासा झाल्यावर मला फोन केला. मला वाटते आपण सर्व जण आपल्या खांद्यावर ही भुतकाळातली मा़कडे घेउन वावरतो. कोण छोटी छोटी पिल्ले तर कोणी मोठी वानरे. काहीजण तर खांद्यावर 'कीगकॉंग' घेउन वावरतात. माझ्या खांद्यावरचे एक छोटे पिल्लू मी 'मिपाकरांच्या' मदतीने हाकलले होते. त्याचा फोन आल्यावर मी जरा आश्चर्यचकीत झालो. अचानक २७ वर्षाचा मधला काळ पटकन नाहीसा झाला. गप्पा झाल्या. मुळ त्रास कळला. रात्री घरी आल्यावर लेखमालिकेतील पात्रे फेर धरुन नाचायची डोळ्यासमोर. बोलायची. कधी कधी दिसायची सुद्धा. समजायला जरा कठीण आहे. पण असेच होत होत हे खरे. इथे दोन प्रसंग सांगतो दहावीत असतानाचे.एका वेळी सहा सहा पतंग आणण्याची परिथीती आमची नव्हती. त्यामुळे पतंग फाटला की शिजवलेल्या भाताची खळ करुन तो परत चिकटवायचा आणि परत वापरायचा. एका संध्याकाळी पतंग उडवत असताना हा आला माझ्याकडे. पेपरात ठेवलेल्या भाताकडे बघुन म्हणाला, "हा भात मी खाउ" पतंग उडवण्यात मी गर्क होतो. मी लक्ष नाही दीले. त्याने तो थोडासा भात चक्क खाल्ला. घरी आईला आल्यावर हा किस्सा सांगितला. आईचा चेहेरा पडला. "त्याला एकदा जेवायला बोलव" आई म्हणाली. तेंव्हा फारसे महत्व वाटले नाही पण आज कळते. शाळा सुटल्यावर आईने सांगितल्याप्रमाणे त्याला जेवायला घरी घेउन आलो. आईने अगदी बाजुला बसुन प्रेमाने वाढले. पोट्भर जेवला. जेवण झाल्यावर डोळ्यावरची पेंग बघुन '"झोप आज इकडे" असे म्हटले. झोपला तो. साधारण १० मिनिटानी त्याने झोपायची पद्धत बघीतल्यावर मी पण चक्रावलो. आईला बोलवले. संपुर्ण 'फीटल' पोझिशन मधे होता. आईच्या डोळ्यात पाणी. बाजुला बसुन केसात हात फिरवु लागली. जवळ जवळ १५ मिनीटे तशीच बसुन होती. ------------------------------------------------------------------------------------------------फोनवर इथुन अमेरीकेला गेल्यावरचे रामायण कळाले. मी त्याला त्याच्या डॉक्टरचा फोन नंबर विचारला. फोनवर त्याच्याशी बोलल्यावर प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही ह्याचा अंदाज आला. डॉक्टर सुद्धा मीच तो एकमेव मित्र हे कळल्यावर मोकळे पणाने बोलला. He needs to connect with you. How are you going to manage that.- Dr. That is not a problem. He also needs to be trained to forgive a lot of people.- मी Are you a shrink -Dr. No, just a good friend. मी -----------------------------------------------------------------------------------------------ही कहाणी मिपावर टाकुन 'किंग कॉग' पासुन सुटका हा एकच उपाय मला दिसत होता. पुढील कहाणी तर तुम्हाला माहीत आहे. ही कहाणी माझ्या लेखन शक्ती बाहेरची होती. अवलियाना साद घातली. लेखन मिपावार येत गेले. प्रतिसाद पण ट्रीटमेंट मधे भरच घालत होते. किंबहुना हे असेच होणार अशी मला आणि अवलियाला खात्री होती. आणि तसेच झाले. २ र्‍या भागानंतर त्याने भारतामधे यायचा माझा सल्ला मानला. आई कडे आला. तीला क्षमा केली. एकमेकांच्या कुशीत हमसुन रडले माय लेक. काल आईला घेउन वॉशिंगटन ला रवाना झाला. जाताना सर्व मिपाकरांचे आभार मानण्यास विसरला नाही. आता झळांचा त्रास नाही. अमेरिकेला गेल्यावर बायको ला पण क्षमा करुन परत येण्यास सांगणार आहे. (बायकोची इच्छा असल्यास).मुलाशी संपर्क वाढवणार आहे. जाता जाता: ७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय? -----------------------------------------------------------------------------------------------

वाचन 6336 प्रतिक्रिया 39