मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्लोळती रंगरेषा

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
गूढ जांभळ्या कोन्यात क्लांत आदिम श्वापद माझ्या मातीच्या पायांची लाल, रांगडीशी याद कधी शुभ्र झळाळतो एक कोना आरस्पानी अद्भुताची निळी हाक मग गुंजतसे कानी कुतूहलास पारव्या केशरीशी ज्ञानफळे हिर्वळीस सर्जनाच्या किल्मिषांचे खत काळे कल्लोळती रंगरेषा अशा रात्रंदिन मनी इंद्रधनूची कमान शोधू कशाला गगनी

वाचन 3519 प्रतिक्रिया 11