मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? ( भाग1)

शरद · · काथ्याकूट
"संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? ( भाग1) आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भानगड कुठून आली ? आपल्या कथेकरी शरदबुवांना हे काय सुचले ? सांगतो. निफाडकर विद्यावाचस्पतींनी एक लेख लिहला "संस्कृती व समाज "त्या एका लेखात इतकी चुकीची, संशयास्पद व हास्यास्पद विधाने आहेत की मला वाटू लागले की आपण ज्याला "संस्कृति" म्हणतो ती त्यांच्या "संस्कृती" पेक्षा निराळी असावी. मग मी औरंगाबादकर प्रा.विद्यावाचस्पतींना विचारले "संस्कृति" म्हणजे काय हो ? ते म्हणाले "गुरुजी, एकदम शिंपल, संस्कृति म्हणजे civiliazation" नाही कळले ? मग culture तरी समजते ना ? . लागला आमचा निकाल ! मग म्हटले आता निफाडकर बघू. त्यांनी माझ्याकडे एखाद्या सिनियर लेखकाने नवोदित लेखकाकडे बघावे तसे पाहिले व एक चाळिस मिनिटांचे लेक्चर दिले. मला काहीच कळले नाही पण नंतर लक्षात आले ते अहिराणी बोलीत बोलत आहेत. आपले मराठीचे तोकडे ज्ञान नडतय. द्या सोडून. आपल्या मिपावरच्या मित्रानाच विचारू हा प्रश्न.. तर मित्र हो, तुम्हाला "संस्कृति" म्हणजे काय वाटते ते सांगा. मी वाचलेले मी भाग (2) मध्ये सांगणार आहेच.विस्तार जरा जास्त असल्याने निराळा भाग केला आहे. आता डॉ. देवरे यांच्या लेखातील मला खटकलेले काही मुद्दे देत आहे. (1) . भारतातील जातककथांवर आधारलेली वेगवेगळी शिल्पे पाहिलीत की त्या कशा उत्तम दर्जाच्या कलाकृती आहेत हे स्पष्ट होते. उदा. घारापूरी, अजिंठा, वेरूळ, कार्ले, अओरिसातील सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, मध्यप्रदेशातील खजुराहो, दक्षिण भारतातील अनेक हेमाडपंथी मंदिरे ही उत्तम कलाकृतीची उदाहरणे आहेत. जातककथा म्हणजे बुद्धाच्या पूर्वायुष्यातील गोष्टी. आता डॉ..देवरे याना घारापुरी, खजुराहो,(हिंदू + जैन) कोनार्कचे सूर्यमंदिर, पूरीचे जगन्नाथ मन्दिर येथील हिन्दु शिल्पात बुद्धाच्या पूर्वायुष्यातील कोणती शिल्पे दिसली बरे ? काय होते, तुम्ही असली चुकीची उदाहरणे देऊ लागलात की तुम्ही ही मंदिरे पाहिली आहेत की नाही याचीच शंका येऊ लागते. (2) सेच गीता, कुराण, त्रिपिटीक, बायबल, झेंद, अवेस्ता (पारशी), झेन, ताओ, अरण्यके, पिटके, जैन आगमे (जैन), गुरू ग्रंथसाहेब हे ग्रंथही केवळ काव्य नाहीत झेन म्हणजे बौद्ध धर्मातील.माहायान पंथाची चीनमधील एक शाखा. ताओ म्हणजे मार्ग. Within the context of traditional Chinese philosophy and religion, the Tao is the intuitive knowing of "life" that cannot be grasped full-heartedly as just a concept but is known nonetheless through actual living experience of one's everyday being. The Tao reverses the typical [cultural] order of values: it emphasizes the weak over the strong, the feminine over the masculine, the water that wears down the rock, the space between things rather than the things themselves.{विकिपेडिआ} डॉक्टरसाहेब ही काव्ये नव्हेत हो. (3)जगात सर्वत्र कलावंत आणि राजकारणी यांच्यात नेहमी वैचारिक युध्दे होत असतात. संगीत, चित्र, नृत्य, शिल्प इत्यादी कला घ्या. यातील कलाकार विचारवंत म्हणून कोठेच प्रसिद्ध दिसत नाहीत. मग त्यांनी राजकारणी लोकांशी वैचारिक युद्ध करणे ही एक हास्यास्पद कवीकल्पना दिसते. जगातील, गेल्या हजारो वर्षातील 5-10 कलावंतांची नावे द्याना. (4) राजकारणी लोकांना कलावंतांशिवाय पुढे जाता येत नाही इतिहासातील राजकारणी म्हणजे राजे-सुलतान. यांतील बर्‍याच जणांनी कलाकारांना आसरा दिला याची साक्ष इतिहासात मिळते. पण कोणीही कलाकारांशिवाय नेस्तनाबुत झाला याचे उदाहरण मला माहीत नाही. जरा मदत करा. उलट औरंगजेब हा कलाकारांचा द्वेष्टा दीर्घकाळ भारताचा सम्राट होता. (5) कुराण-बायबल बद्दल श्री. गामा पैलवान यांनी प्रतिक्रिया दिली आहेच त्याचावर डॉक्टरसाहेबांनी धन्यवाद देऊन त्यांना गुंडाळले आहे. मीही कुराणाचे मराठी भाषांतर वाचले आहे. मला तरी त्यात कोठेही विशाल मानवी संवेदनशीलता दिसली नाही. दुरुस्त केल्यास आनंदच होईल. (6) सहा सुविख्यात आरण्यकांपैकी ("अरण्यके" ही टंकलेखनातील चूक समजून चालू ) काव्य म्हणावयास कोणती गद्य आहेत, कोणती पद्य आहेत व कोणती गद्य-पद्य आहेत हेही सांगा. शेवटी घरात आलेल्या वयोवृद्ध माणसाला नमस्कार करावयाचे हे माझ्या वडीलधार्‍यांकडून मी शिकलो. माझी मुले माझ्याकडून व त्यांची मुले त्यांच्यापासून. ही झाली.सनातन परंपरा किंवा संस्कृति. आता याचा संबंध मी मोटर चालवतो किंवा नात मोबाईल वापरते याच्याशी काय येतो ? आम्ही ढोंगी आहोत कां ? मीही श्री. गा.पै. सारखे विचारतो की तुम्हाला नक्की काय सांगावयाचे आहे ? संस्कृति म्हणजे काय़ ? समाज म्हणजे काय? या वरचे तुमचे मत व त्यांचा कोणता संबंध तुम्हाला अभिप्रेत आहे हे स्पष्ट करा आमचे मित्र श्री. माहीतगार आता विचारतील की हा निराळा धागा का ? तेथेच प्रतिसाद म्हणून द्यावयास पाहिजे होते. याचे उत्तर असे की डॉ. देवरे "धन्यवाद" म्हणून गुंडाळून टाकण्याची शक्यता व मला पाहिजे आहे संस्कृति बद्दल.मिपाकर मित्रांना असलेली माहिती किंवा त्यांच्या कल्पना. . शरद

वाचन 9122 प्रतिक्रिया 26