मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंदी

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय? हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा. अगदी बालवर्गात असलेल्यांना शिकवातात तसे. सर्व माहीत असलेल्यांनी माहीत नसलेल्यांना 'मंद' आहेत म्हणुन सोडुन द्यावे. मार्ग दाखवावा.

वाचन 10762 प्रतिक्रिया 60