आरक्षणाशिवाय कसे जगावे?
मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे.
तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल.
काय अपेक्षित आहे? :
१. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे.
२. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे.
३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये.
४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती.
५. हा 'खर्या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या.
६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन.
खूप खूप धन्यवाद!
वाचन
36641
प्रतिक्रिया
0