मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खेचयाचे बोम्बिल

नीळा · · पाककृती
खेचयाचे बोम्बिल ही पाककृती माझ्या बाबाची आहे. पावसात ताजे मासे मिळत नाहीत पण जीभ खवऴते तेंव्हा आम्ही तेव्हा आम्ही बर्याचदा हे तोंडीलावाण करतो फार फार वर्षापूर्वी बाबा सूरतला गेले होते , तिथे त्यानी एका होटेलात हा पदार्थ खाल्ला. खुप पाउस पडत असताना गर्मागरम भात आणि मग सुक्या सुगंताची कढ़ी हा बेत सहसा असतोच. खेचयाचे बोम्बिल हे नाव माज्या लेकिने दिलेय , कधी कधी घाई असेल तर बोम्बिल निट भिजत नाहीत आणि मग जरा चिवट होतात. म्हणून मग “खेचयाचे बोम्बिल.” साहित्य : चागले जाड बोम्बिल १-१/२ तास भिजत घालावेत. मग सुरीने कापून पसरट करावेत. आम्सुल आणि मिरचीची पेस्ट बनावुन त्यात घोल्वुन खरपुस तळऊन घ्यावेत

वाचन 6980 प्रतिक्रिया 0