मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घट पोटावर घट कमरेवर...

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गेल्या २-३ महिन्यात बर्फ आणि थंडिमुळे आमचे पळायला जाणे बंद झाले.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला, वाढता वाढता वाढे भेदिले शुन्य मंडळा ह्या न्यायाने आमच्या सर्व तुमानी आम्हाला घट्ट व्हायला लागल्या. याच सुमारास आमच्या बिनतारी मित्राचा आमी कापड का घाल्तो ह्या गहन विषयावरचा आत्मपरिक्षणात्मक लेख वाचनात आला. तेव्हापासून पी. सावळाराम यांचे घट डोईवर घट कमरेवर,हे गाणे आम्ही काही केल्या सरळ म्हणू शकलो तर शप्पथ.... घट पोटावर घट कमरेवर, तुमान सार्‍या , केशवाला, केशवाला रे नवीन मी घेईल लुज बी होईल कोण त्यावर बेल्ट हा लाविल, वापर तू या कर्गुट्याला, कर्गुट्याला रे उठता बसता, बटन निखळता पोष्ट हपिस अन उघडे पडता ओढून घेई सदर्‍याला, सदर्‍याला रे केलीस खोडी, नको एवढी जोवर हसते मनात गोडी कुणीतरी सांगा ह्या मेल्याला, ह्या "केश्या"ला रे केशवसुमार

वाचन 3970 प्रतिक्रिया 17