मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धुकट सकाळ

धनंजय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र) picture (पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे. ठेका दाखवण्यासाठी टाळ्या देणारे मेट्रोनोम यंत्र ८०/मिनिट टाळ्या देत आहे.**)
Get this widget | Track details | eSnips Social DNA
धुकट सकाळ
*** किती बर्फ पडला पहाटे बघितले कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते सुटीच्या सकाळी असावे तसे हे पहा गप्प रस्ते रिकामे रिकामे
* धुरांड्यांवरून आकृती या धुराच्या अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी ***
.

वाचन 11836 प्रतिक्रिया 34