मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागली स्पंदने नवी नवी

रातराणी · · जे न देखे रवी...
काव्यरस
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं. बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले. हौशी आणि बरा आवाज असणाऱ्या कुणीतरी या गीताला आवाज देऊन मराठी रोम्याँतिक गाण्याच्या दुनियेत अजरामर करावे ही विनंती आणि समीरसूर यांना ते सकाळ दुपार संध्याकाळ मात्रेसारखे ऐकवन्यात यावे ही विनंती. सॉफ्ट कोरस: ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला जागली ह्रुदयात स्पंदने नवीs नवीs साथ तुझी सख्या वाटते हवीs हवीs लाउड कोरस: ला ला ला ला ला ला तुझा स्पर्श की मोहोर हा तनाs मनाs गूज माझे कळे ओथंबलेल्या घनाs घनाs लाउड कोरस: ला ला ला ला ला ला सांजवेळी सख्या का काहूर दाटते उरीs उरीs का भास होती तुझे तू नसता जवळी तरीs तरीs लाउड कोरस: ला ला ला ला ला ला मिठीत तुझ्या साजना बहरून आल्या जाईs जुईs एक झाला आत्मा अता तुझ्यामाझ्या देहीs देहीs लाउड कोरस: ला ला ला ला ला ला जागली ह्रुदयात स्पंदने नवीs नवीs साथ तुझी सख्या वाटते हवीs हवीs ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला

वाचन 7701 प्रतिक्रिया 31