मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लंडन कट्टा - सालाबादप्रमाणे यंदाही होणार!

आदूबाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेली दोन वर्षं लंडनमध्ये मिपाकरांचा वासंतिक कट्टा होतो आहे, पण त्याचे वृत्तांत आणि फोटो कुठेही लीक होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. ;) पण यंदा न्यूयॉर्क आणि रत्नागिरी या जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये मिपाकट्टे करायचं घाटत असल्याने तमाम (ग्रेटर) लंडनवासी मिपाकरांच्या हृदयांत कालवाकालव झाली. तसंच ज्येष्ठ आणि तरूण मिपाकर विजुभाऊ यांचं नुकतंच राणीच्या देशात आगमन झालं असल्याने कट्टा करायच्या बेताला पाठबळ मिळालं. तर आतापर्यंत ठरलेले तपशील असे: तारीखः १८ जून २०१६ स्थळः ग्रीनिच ग्रीनिचमध्ये सुप्रसिद्ध ग्रीनिच वेधशाळा तर आहेच, पण सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची आठवण म्हणून बांधला गेलेला "सेवेर्नदुर्ग कासल"ही आहे. मालोजीरावांनी त्याबद्दल लिहिलेला लेख येथे मिळेल. परत बदल होऊन मूळ ठिकाण नक्की झाले आहे. अनाहिता धरून जवळजवळ दहा तरी लोकांची उपस्थिती असेल असा प्राथमिक अंदाज आहे. यूकेस्थित मिपाकरांस कट्ट्यास उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास मला किंवा विजुभाऊंना व्यनि करावा. कार्य सिद्धीस नेणेस कट्टाप्पा श्रीमुवि समर्थ आहेतच ;) कळावे, आपला...

वाचन 20563 प्रतिक्रिया 63