मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्याचे प्रयोग

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तुला मैत्रीणी किती रे? तात्यानी माझ्या चिरंजिवाना प्रश्न विचारला. त्याने काय उत्तर दिले ते कळाले नाही. कारण 'बिस्किट आंबाड्यांचा" ताजा घाणा आणायला किचन मधुन हाक आली होती. वैधानिक इशारा: 'सत्याचे प्रयोग' व्यावसायिक्(प्रोफेशनल) ट्रेनिंग असल्याशिवाय करु नयेत. अनुभव नसेल तर 'त्वांड फुटते'. हा इशारा डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. च्या पैलवानांच्या इशार्-याच्या धर्तीवर वाचावा. वरील प्रष्न तात्यानी माझ्या घरी अचानक ठरलेल्या 'अल्पोपहार कट्टा' वर विचारला. त्याचे उत्तर त्याने काय दिले हे परत विचारणे मला बरोबर वाटले नाही. गरज पण वाटली नाही. आता त्याच्या प्रश्नांची उत्तरे मी कशाला संभाळू? त्याचा मुखत्यार तो. हा प्रश्न आमच्या कुटंबाच्या कानावर पण गेला होता. दुस-या दिवशी चिरंजीव कॉलेजला गेल्यावर ब्रेकफास्ट देताना 'तुम्हाला मैत्रीणी किती होत्या हो' हा प्रश्न पुरीचा घास तोंडात असताना अचानक बायकोने विचारला. 'खिंडीत पकडणे' ह्यालाच म्हणतात. कुठल्याही प्रकाराचा ठसका लागणे घातक हो अशावेळी. मी चेहेरा निर्विकार (पोकर फेस) ठेवुन 'म्हणजे काय' असा प्रतिप्रश्न केला. ' जरा भाजी दे थोडीशी' असे म्हटल्यामुळे जरा वेळ मिळाला विचार करायला. "तु कुठल्या मैत्रिणींबद्दल विचारते आहेस शाळेतल्या का नंतरच्या" असा 'अनेकवचनी' उत्तराला ती गोंधळली. तेवढाच अजुन वेळ मिळाला. 'एवढ्या होत्या का' -थोडा विचार करुन आलेला प्रश्न. मग मी सविस्तर उत्तर दिले. शाळा: ९ ते ११ वी साधारण ५ मैत्रीणी होत्या. पण त्यांतली मला एकच चार फुटावरुन आवडायची(सेफ्टी फर्स्ट). तुझा चेहेरा आणि अंगलोट तिच्याशी मिळती जुळती आहे. बाकी चार जणींना मी आवडायचो हे मला ११ वी नंतर कळाले मित्रांकडून. त्यातल्या एकीने तर हे कन्फर्मेशन ठाणे प्लॅट्फॉर्म नंबर १ वर १५ वर्षाने दिले. कॉलेजः आता शाळेत एवढ्या तर कॉलेज मधे किती गोंधळ असेल असा विचार करु नकोस. शाळेतल्या इन्फॅचुएशन्ला फारसा अर्थ नव्हता. कॉलेजमधली वर्ष अगदी निरस होती. दोन पँट दोन शर्ट वर वर्ष जायचे. वैनीने दिलेल्या ५ चपात्या (प्लॅस्टीक मधे गूंडाळलेल्या )कॅटीनमधे बसुन मित्रांनी मागवलेल्या वडा सांबारात थोडासा सांबार व चटणीला लावुन काढली. मैत्रीणी परवडण्यासारख्या नव्हत्या. किती खर्चीक काम असते ते. (चेहे-यावर समाधान) जॉब लागल्यावर : मी तसे कधीही कोणावरही प्रेम केले नाही. हे का ते मला माहित नाही. कमावता झाल्यावर साधारण ५ जणीनी 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे एक फुटावरुन सांगितले होते. ह्या प्रेमापासुन सुटका करुन घेण्याकरता मी त्यांना गणपतीला घरी बोलवत असे. गणपतीला घरातली उठबस्,पंक्त्या बघुन सर्वांचे प्रेम अगदी स्पिरीट प्रमाणे उडाले. नंतर नुसतीच बोलाचाली, अंतर राखुन. पण हॉस्पिटलमधील काळाचे काय?- तिथे तर सर्व नंदनवनच असणार्- बायको अग, माझा साहेब 'कर्दनकाळ' होता.कामावर लागलेल्या पहिल्या दिवशीच अगदी गवळणींसमोर मला दम दिला होता. ' इथे कुठे नजर (दृष्टी) वा़कडी केलीस तर दोरीने आवळुन पंख्याला लटकवीन्.(इथे नेमके कुठला अवयव ते सांगणे प्रशस्त होणार नाही. पण गळा नक्कीच नाही.) त्या भितीने तसा काही प्रसंग आला नाहीच. ( इथे साहेबांबद्द्लचा आदर द्विगुणीत) आणि तु ते 'दिल मिल गये ' सिरीयल वर हॉस्पिटल लाईफ बद्दल काहीही नि:श्कर्ष काढु नकोस. तीथे श्वास घ्यायला फुरसत नसायची प्रेम कसले करताय. थोडक्यात मी 'सर्टिफाईड वर्जीन' ह्या अवस्थेत तुझ्याशी लग्न केले आहे. बायकोचे एकंदरीत समाधान झालेले दिसले आणि मी सुस्कारा सोडला. जाता जाता: कामावर जाण्यासाठी पायात बुट घातले आणि बायको प्रश्नाळली. "काय हो, मग लग्नाआधी सुद्धा लग्न झालेल्यांना तुम्ही सल्ला द्यायचा असे माझ्या जावा मला सांगतात. तेंव्हा तुम्हाला प्रॅक्टीकल चे एवढे ज्ञान कसे? 'आता मला उशीर होतो आहे , नंतर बोलीन " असे म्हणुन सुटका करुन घेतली. आता ह्या चक्रव्युहातुन सुटायचे कसे.? ५ हा माझा खरेच भाग्यांक आहेका? का घातांक. दुपारी १४ वाजता उत्तर द्यावे काय (परत ५)

वाचन 10114 प्रतिक्रिया 49