गोठान (वर्‍हाडी) (मराठी भाषा दिन २०१६)

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in लेखमाला
26 Feb 2016 - 7:59 am

माया गावाचं गोठानं
हाये किती शानदारं
मोठ्ठं झाळं पिपयाचं
त्याची सावली भर्दारं

माया गावाचं गोठानं
थंड हवेचं ठिकानं
ढोरं, मान्सं उनायातं
झोपं घेतातं सुखानं

माया गावाचं गोठानं
हौदं भरला पान्यानं
ढोरं, वासरं पेतातं
पानी मोकाट मनानं

माया गावाचं गोठानं
काई लोकाचं मायेरं
ऊभा दिवसं तथीसा
सारे हायेतं तयारं

उनं चित्याले कोनाचं
नाई दुसरं ठिकानं
मनं मोकयं पनानं
माया गावाचं गोठानं

खोळ्या कर्याले कोनाच्या
नाई दुसरं ठिकानं
चिट्या चिकोर्या कर्याले
माया गावाचं गोठानं

तंटे भांडन कर्याले
नाई दुसरं ठिकानं
मायं बहिनं काळ्याले
माया गावाचं गोठानं

माया गावाचं गोठान
आक्क्या बनलं मोकाटं
सज्जनाईले ते आता
नाई टोचू देतं नाथं

प्रतिक्रिया

अजया's picture

26 Feb 2016 - 8:00 am | अजया

कविता आवडली.

एस's picture

26 Feb 2016 - 8:01 am | एस

छान कविता.

यशोधरा's picture

26 Feb 2016 - 8:23 am | यशोधरा

मस्त कविता. शेवटच्या कडव्यातले काही शब्द - आक्क्या, आणि शेवटच्या ओळीचा अर्थ सांगा प्लीज.

नाखु's picture

26 Feb 2016 - 9:22 am | नाखु

तिथेच अडलो

प्रचेतस's picture

26 Feb 2016 - 9:17 am | प्रचेतस

अप्रतिम

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Feb 2016 - 9:29 am | श्री गावसेना प्रमुख

गावंडे सर,ही कविता अहिराणीत आहे की खांदेशी मराठीत.

स्वामी संकेतानंद's picture

26 Feb 2016 - 2:37 pm | स्वामी संकेतानंद

खानदेशी वाटली.

भुमी's picture

26 Feb 2016 - 10:02 am | भुमी

छान कविता!

प्रीत-मोहर's picture

26 Feb 2016 - 10:19 am | प्रीत-मोहर

आवडली कविता

रातराणी's picture

26 Feb 2016 - 10:44 am | रातराणी

सुरेख!

वेल्लाभट's picture

26 Feb 2016 - 12:40 pm | वेल्लाभट

वाह! आवडलीय

सस्नेह's picture

26 Feb 2016 - 2:24 pm | सस्नेह

अहिराणी ही खानदेशी सारखी वाटते.

पैसा's picture

26 Feb 2016 - 2:27 pm | पैसा

अतिशय सुरेख कविता.

मित्रहो's picture

26 Feb 2016 - 4:44 pm | मित्रहो

छान

नीलमोहर's picture

26 Feb 2016 - 5:14 pm | नीलमोहर

किती गोड वाटते ही भाषा ,
खानदेशी असूनही एवढी सुंदर भाषा नीट येत नाही याचं फार दु:ख होतंय.

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Feb 2016 - 6:35 pm | श्री गावसेना प्रमुख

अहिराणी भाषा येगळी शे आस माले तरी वाटस,गावंडे भो बराबर शे का नई बर

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Feb 2016 - 6:49 pm | श्री गावसेना प्रमुख

अहिराणी ही भाषा खान्देशात वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते,सटाना साक्री भागाची वेगळी,जळगाव भुसावळ चोपडया ला वेगळी,शिरपुर शहादा जिथे पावरा आदिवासींचे प्रमाण लक्षणीय आहे तिथे पावरी गुजराथी अहिराणी मिक्स।गावंडे साहेबांची ही कविता जळगाव च्या बोलीभाषेत आहे वाटते, मला अहिराणी येत असली तरी त्याबद्दल जास्तीची माहिती नाही, गावंडे साहेब खांदेशी दिसताहेत त्यांना जर ह्यबद्दल जास्तीची माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी.

चांदणे संदीप's picture

26 Feb 2016 - 7:10 pm | चांदणे संदीप

उत्तम कविता. बहिणाबाईञ्चा वारसा गावंडे साहेब समर्थपणे पुढे नेत आहेत. दुसर कोणी अशा भाषेत आणी इतक दमदार लिहिणार माझ्यातरी पाहण्यात नाही!

तंटे भांडन कर्याले
नाई दुसरं ठिकानं
मायं बहिनं काळ्याले
माया गावाचं गोठानं

सर्वच गोष्टी अगदी मोकळेपणाने कवितेत आणल्याबद्दल विशेष कौतुक!

Sandy

जव्हेरगंज's picture

26 Feb 2016 - 7:14 pm | जव्हेरगंज

सही !!

ऊध्दव गावंडे's picture

26 Feb 2016 - 8:25 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद! मित्रांनो...
ही वर्हाडी बोली आहे, जी प्रामुख्याने अकोला,अमरावती,वाशीम,बुलढाणा,यवतमाळ जिल्ह्यात बोलली जाते. वर्हाडी आणि खानदेशी बोली मध्ये बरंचसं साम्य आहे.
काही मित्रांना शेवटच्या कडव्या मधील शब्दांनी अडवून ठेवलय त्यांची सुटका करु या.
आक्क्या - गावात मोकाट सुटलेला सांड
नाथ - वेसन
शेती कसण्या करिता आपण बैल उपयोगात आणतो त्यांना वेळ प्रसंगी आवरण्या साठी त्यांच्या नाकातून सुती धाग्यांपासुन बनवलेली वेसन कामात येते. परंतु या आक्क्यांच्या नाकात असे काहीच नसते.त्या मुळे आपण त्यांना आवर घालू शकत नाही.
पुन्हा एकदा धन्यवाद!

जेपी's picture

26 Feb 2016 - 9:09 pm | जेपी

कविता आवडली.

भीडस्त's picture

27 Feb 2016 - 12:52 pm | भीडस्त

आवडली

विवेकपटाईत's picture

27 Feb 2016 - 5:32 pm | विवेकपटाईत

कविता आवडली.

आवडली कविता!