मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेअरबाजार; प्रासंगिक - तांत्रिक विष्लेषणाच्या नजरेतुन काही रचना

प्रसाद भागवत · · काथ्याकूट
http://www.misalpav.com/node/31247 आज दिवसाअखेर निफ्टीच्या दैनेंदिन फ्युचर्सच्या आलेखावर (chart) तांत्रिक विष्लेषणाच्या भाषेत ज्याला 'हॅंगिग मॅन' असे म्हटले जाते, अशी, येत्या दिवासांत (अल्प्कालीक) मंदीचा संकेत ठरणारी रचना झालेली दिसते. तेजीच्या आवर्तनादरम्यान आणखी एका सकारात्मक सुरवातीनंतर बाजार अचानक ढेपाळतो,...पण थोड्याच वेळांत सावरुन झालेले नुकसान भरुन काढत तो दिवसाच्या सुरवातीची पातळॅए ओलांडुन वर जातो. मात्र उत्तरार्धात तो थोडासा नरमुन जवळ्पास दिवसाच्या सुरवातीच्याच पातळी जवळ तो बंद होतो. या रचनेस 'हॅंगिग मॅन' अशी संज्ञा आहे. बाजारांतील तेजीस कारणीभुत असणारे काही मोठे भिडु ( बाजाराच्या परिभाषेत strong hands) या तेजीबद्दल साशंक झाल्याने सुरवातीसच विक्रीचा जोर लावतात. मात्र तेजीच्या प्रवाहात काहीसे उशीरा शिरलेले हौशी वा तुलनेने कमकुवत घटक त्यांनी केलीली ही विक्री म्हणजे 'खरेदीची सुसंधी' असे मानुन विक्रीचा मारा पचवतात. मात्र त्यांचे अवसान फारकाळ न टिकल्याने बाजार दिवसांतील उच्चांकी पातलीपासुन खाली येतो... असा या घडामोडीमागचा अनव्यार्थ असल्याने ही रचना येत्या काळांतील मंदीकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे भरीस भार म्हणजे आत्ता बाजार तांत्रिकदृष्ट्या महत्वाच्या अशा 200 दिवसांच्या सरासरीच्या अगदी जवळ आहे.... अर्थात हा काय किंवा असेच अन्य संकेत हे फक्त ठोकताळे वा अंदाज आहेत, हमखास यशाचे सुत्र वा काळ्या दगडावरची रेघ नव्हे. तेंव्हा पाहुया काय होते. - प्रसाद भागवत

वाचन 5522 प्रतिक्रिया 6