मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधी.

कलंत्री · · जनातलं, मनातलं
वाघ म्हटला तरी खातो वाघाबो म्ह्टला तरी खातो तर वाघ्याच का न म्हणावं? एक वाक्प्रचार. सध्या बंगालच्या वाघीणी या लेखाद्वारे आम्हाला गांधीवर इतरत्र चर्चा करा असे सांगितल्यामुळे हा वेगळा पंक्तिप्रपंच. आता मुळ विषयाकडे. गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे. कृपया आपले रोखठोक विचार मांडावे ही विनंती. गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का? गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का? गांधींनी सत्याग्रहाचा पुरस्कार करुन देशाचा घात केला का? गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का? गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का? ५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे? गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का? गांधी जर राजकारणात आले नसते तर एक वकिल, एक लेखक अथवा जागतिक विचारवंत होऊ शकले असते का? गांधी प्रामाणिक होते का? गांधींनी एकाच वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काम केले ( निसर्गोपचार, हिंदी राष्ट्रीय सभा, आश्रमाचे जीवन, साध्य-साधन विवेकाचा आग्रह, सत्याग्रह हे योग्य होते का? ) गांधी अन्य समाजात जन्माला आले असते तर असे प्रभावी राहिले असते का? किंवा ब्रिटीश ऐवजी वेग़ळी राजवट असतीतर गांधी प्रभावी ठरले असते का? स्वातंत्र्य युध्दात जसे गांधींना मोठी खेळी खेळता आली ( १९१७ ते १९४७) तशी गांधींना स्वातंत्र्य काळानंतर मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे असले असते का? गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले. गांधीच्या बाबतीत शासनाचे धोरण काय आहे? ( पूर्वी आकाशवाणीवर गांधीवंदना हा कार्यक्रम येत असे तो बंद झाला.) गांधीविचार आजच्या काळात अप्रस्तुत आहे काय? दहशतवादावर गांधीविचाराने काही तोडगा निघु शकेल का? किंवा आपल्याला जे काही योग्य वाटेल ते विचार जरुर मांडा.

वाचन 14726 प्रतिक्रिया 61