मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा · · जनातलं, मनातलं
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. प्रत्येक टोळाने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये. एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

वाचन 19070 प्रतिक्रिया 42