मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक विलक्षण अनुभव

विनायक पाचलग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आय.आय.टी.सारख्या अत्युच्च संस्थेतुन शिक्षण ,एक व्यवसाय,मुळ गाव अगदी साधे.ही माहीती ऐकल्यावर ती व्यक्ती तुम्हाला कोण वाटेल एखादी आय टी प्रोफेशनल किन्वा कष्टातुन भविष्य घडवलेली एखाद्या संस्थेची अध्यक्ष.अह! ती तशी नाही. कारण काल मी या व्यक्तीला भेटलो .ती नोकरी करत नाही आणि तीचा व्यवसाय तर नाहीच नाही मग ती करते तरी काय ?? पुर्णवेळ राजकारण !!!!!!!!!! हादरलात किंवा ती कोण ते आठवत नाही.बर सांगतो ती व्यक्ती मा.मनोहर पर्रिकर गोव्याचे माजी मुख्यमन्त्री आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वत: एक पैचा ही भ्रष्टाचार न करता ५ वर्षे हे पद सांभाळु शकलो असे सांगणारे आताचे विरोधी पक्षनेते.मनोहर पर्रिकरांचे विचार ऐकण्याची संधी मला काल मिळाली.त्यानी काल "राजकारण आणि चारित्र्य" या विषयावर पक्षातीत विचार मांडले.ते अत्युत्तम होते.पहिल्यांदाच एका राजकीय नेत्याकडुन इतके अभ्यासपुर्ण विचार ऐकावयास मिळाले. त्यानी सांगीतलेल्या काही विचार करावयास लावणार्या आणि उपयुक्त गोष्टी येथे देत आहे. प्रथम त्यानी एक गोष्ट स्पष्ट केली की राजकारणी हा चारित्र्यवान हवा आणि चारित्र्य म्हणजे फक्त पैसे न खाणारा न्हवे तर स्त्री,कुटुंब,पुर्वेतिहास या सर्व बाबतीत स्वछ चरित्र असणारा! माझ्या मते आज आपण जी चर्चा करतो स्वच्छ चरित्राबाबत त्यात हा मुद्दा नक्की विचारात घेतला जावा.असे मला(लेखक्)वाटते. यानतर त्यानी सांगीतले की आजही देशात स्वच्छ चारित्र्याचे राजकरणी आहेत,आणि सनदी अधिकारीही.मात्र त्यांची योग्य कदर न केली गेल्याने ते काम सोडतात.(यासाठी त्यानी आदल्यादिवशीच व्याख्यान दिलेल्या अरवींद इनामदारांचेउदाहरण दीले.) फक्त शिक्षण म्हणजे चारित्र्य नव्हे यासाठी त्यानी एक उत्तम उदाहरण दीले. त्यांच्याकडे आलेल्या एका प्रकरणात एक प्रस्ताव ४ लाख रुपयाने जादा आलेला होता. नंतर असे सांगण्यात आले की चिखलाची जमीन आसल्याने पाया वाढवावा लागला(गोव्यतील परिस्थीती)पण त्याना शंका आल्याने त्यानी अक्षरशः पाया खोदला आणि भ्रष्टाचार सापडला म्हणजेच जमीनीखालचे कसे बाहेर काढणार अस विचार करणारे भ्रष्टाचारी शिक्षीत होतेच ना? लोक म्हणतात की चांगली माणसे उभारली(निवडणुकीत) की पडतात यावर त्यांचे उत्तर असे की फक्त एकदा उभारुन काम संपत नाही सतत निवडणुक लढवली पाहीजे.यावेळी त्यानी जेनेटीक चे एक सुंदर उदाहरण दीले.लोकांची जबाबदारी कय असे विचारले असता मतदान करणे असे उत्तर मिळाले .ते असे म्हणतात की ज्यावेळी तुम्हाला मतदानाची सुट्टी मिळते तेव्हा जनाची नाही तर निदान मनाची लाज बाळगुन मतदान करावे.आणि तुम्ही म्हणता की सर्वच गुंड असतात तेव्हा त्यातल्या त्यात कमी गुंडाला मतदान करावे ज्यामुळे निदान वाइट गोष्टींची टक्केवारी कमी होइल. चारित्र्यवान राजकारणी ही एका दिवसात होणारी गोष्ट नव्हे मात्र या साध्या उपायातुन ती प्रक्रिया घडत राहील असे त्यांचे मत होते.(हे सांगताना त्यानी गल्लीपासुन दील्लीपर्यंतची अनेक उदाहरणे दीली) याशिवाय त्यांच्या भाषणातुन अनेक अवांतर मुद्दे विषयाला अनुसरुन आले त्यातील लोकांच्या आणि विषेशत: राजकारण्याम्च्या डोळ्यात अंजन घालणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे. १.त्यानी आतापर्यन्त एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही.ते म्हणाले की मला मुख्यमंत्री व्हायच्या ३ तास आधीपासुन ५० लाख ते ५० कोटी एवढ्या ऑफर आल्या पण मी त्या नाकारल्या आणि य सर्वांचे लिखित पुरावे माझ्याकडे आहेत.याशिवाय माझ्या काळात सरकारमधील भ्रष्टाचार ७० टक्याने कमी झाला.आणि एवढे मोहाचे क्षण मी नाकारु शकलो ते फक्त संघाच्या संस्कारामुळे. २.सरकारी अधिकारी खाजगी क्षेत्रापेक्षा २पट चांगले काम करु शकतात्.ते म्हणाले की फिल्म फेस्टीवल वेळी आम्ही सहा महिन्यात चित्रपट्ग्रुह बांधले.जे होणे अशक्य आहे असे मला माझ्या आय्.आय्.टी मधील मित्राने सांगीतले होते.यावेळी रात्री एक एक वाजेपर्यन्त थांबणारा मी प्रसिद्ध झालो पण त्यावेळी अगदी सचिवापासुन सर्व जण तेथे थांबलेले असत .पण ते प्रसिद्ध झाले नाहीत. ३.याउलट हे अधिकारी भ्रष्टाचारही करु शकतात .एका प्रयोगात गावकर्यानी ८० हजार रक्कम सांगीतली तेव्हा अधिकार्यानी ८ लाख सांगीतली होती एवढे पैसे जातात कुठे? एकुण काय तर दोष अधिकार्यांचा नाही तो संगतीचा आहे. ४.(जे ऐकुन मी थक्क झालो ती ही गोष्ट)आजही गोव्यात ११वी १२वीतल्या कोणत्याही विद्यार्थ्याला अवघ्या ५०० रुपयात संगणक मिळतो. ३.समाज खुप चांगला आहे फक्त पैसे मिळाल्यावर मते फेकणारा समाज नव्हे जेव्हा गोव्यात लघु उद्योगासाठी ५०% सरकारी सहाय्य अशी योजना चालु झाली तेव्हा याच लोकानी ती १३५% यशस्वी केली आहे याचा अर्थ माणसे बदल घडवु शकतात. फक्त त्यासाठी वेळ दीला पाहीजे. ४.योग्य राजकारण्याचे ध्येय हे समाधानी समाज असावे असे त्यानी सांगीतले.यासाठी त्यानी गोव्यात चालु असलेल्या पेन्शन योजनेचे उदहरण दीले.तेथे सध्या व्रुद्ध्,अपंग,विधुर्,अनाथ याना दरमहा १००० रु.पेन्शन मिळते.ज्यामुळे समाज सुखात राहतो. तर मनोहर पर्रिकरानी मांडलेले हे विचार .प्रभावी इंग्लीश ,उत्तम उदाहरणे,आणी संत वान्ग्मय ते आजच्या म्हणी इत्यादींचा चपखल वापर यामुळे भाषण खुपच छान झाले त्यांच्या स्पष्ट बोलण्याने तेथे उपस्थीत असलेल्या राजकारण्यान्चे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. मला स्वतला हे भाषण आवडले .आजही राजकारण पुर्णपणे वाइट नाही याची जाणीव झाली.आशेचा किरण गवसला.आणि त्याच आनंदात येथे हा व्रुतात्न लिहित आहे.लिहिताना बरेच राहुन गेले आहे.क्रम जमलेला नाही .पण जे जसे आठवेल तसे लिहित गेलो आहे. या लेखाच्या अनुशंगाने मला त्यांचे विचार्,स्वत: ते,आजचे राजकारणी यासंबंधी आपली मते जाणुन घ्यायला आवडेल. (त्यांची सर्व मते ही वैयक्तीक असुन त्याचा व त्यांचा पक्ष यांचा काहीही संबंध नाही. अवांतर-त्याना स्व.प्रमोद महाजन यानी राजकारणात आणले) यासंदर्भात सकाळ्मध्ये आलेली अर्थहीन बातमीदेखील येथे प्रसिद्ध करत आहे.
चांगले राजकारणी घडविण्याची जबाबदारी मतदारांचीच - मनोहर पर्रीकर
कोल्हापूर, ता. ११ - केवळ शिक्षणामुळेच चरित्र चांगले घडविता येत नाही खरे तर जास्त शिकलेल्या माणसाकडून जास्त भ्रष्टाचार होतो. यामुळे शिक्षणाला चांगल्या संस्काराची जोड असणेही महत्त्वाचे आहे. राजकारणीही मतदाराकडून घडतात. म्हणून चांगले राजकारणी घडविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्नांची गरज असते, अशी अपेक्षा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत "राजकारण व चारित्र्य' या विषयावर श्री. पर्रीकर यांनी अखेरचे पुष्प गुंफले. ते म्हणाले, ""राजकारण्यांना आपण नालायक समजो; पण त्याला आपणच निवडून दिलेले असते. राजकारण कसेही असले तरी सरकार हे कोणीतरी चालवावेच लागते. मात्र ते चालविण्यासाठी नालायक लोक तिथे बसू नयेत, याची खबरदारी घेणे मतदारांच्या हाती असते.'' श्री. पर्रीकर म्हणाले, ""अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला; पण नंतरच्या सात वर्षांच्या काळात एकही दहशवादी हल्ला पुन्हा झाला नाही. याला कारण तेथील कठोर व्यवस्था आहे. आपल्याकडे असे हल्ले किती होतील, हे सांगता येणे ही मुश्कील आहे. सरकारमध्ये येऊन भ्रष्टाचार करण्यास व्यक्ती आपल्या नको आहेत. समाजात जशा वाईट प्रवृत्ती असतात, तशा राजकारणातही असतात. त्यांना वेळीच बाजूला ठेवण्याचे काम समाजाचे आहे.'' या वेळी महापौर उदय साळोखे यांनी व्याख्यानमालेसाठी दहा हजार रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजाराम शिपुगडे, पी. एस. कुलकर्णी, फिलिप डिसिल्वा व तेंडुलकर परिवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या बातमीत मुळ विचारांचा उल्लेखही केलेला नाही. (अक्षेपार्ह वाटल्यास संपादकानी कळवावे,लगेच बातमी काढुन टाकेन) मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. आपला, (अपक्ष्)कोल्हापुरी दादा.

वाचन 6880 प्रतिक्रिया 25