मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर

धमाल मुलगा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चाल : नाम॑जूर अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून.... जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची, वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर || मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको कुठे कसेही वळण्यावरती टाच नको था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर || रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी वेगासाठी देह ठेवतो तारण मी भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर || पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे 'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर || (मी गर्दीला ह्या शाप मानले नाही अन नियम तोडणे पाप मानले नाही खड्डा ज्यावर एकही पडला नाही, असा पथ मी अद्याप पाहिला नाही) नो-ए॑ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी परदेशा॑तून नियम पाळणे मज समजे पण नियमा॑ना इथे पाळणे - नाम॑जूर..नाम॑जूर || ============================= (विद्रोही कवी) - धमाल. ता.क. : ह्या प्रसवाचे उत्तरदायित्व माझे नाही. एव्हढी प्रतिभा आमच्या नशिबी नव्हे! आ॑तरजालावरून साभार.

वाचन 11486 प्रतिक्रिया 0