हाफ शर्ट
लेखनप्रकार
मला काही प्रष्न पडतात. गेले कित्येक वर्षे अनुत्तरित आहेत. ९२ च्या दंगलीत मी जसलोक मधे ४ दिवस भावाच्याबरोबर होतो. हार्ट ऍटॅक नंतर एडमिट केले होते. बाहेर पडणे शक्यच नव्हते. सर्वच पेटले होते. चारही दिवस माणसे बकर्-या सारखी कापलेली अर्धमेली माणसे स्ट्रेचर घालुन आणलेली बघितली. रक्ताचा तुटवडा. शेवटी वेटींग लाउंज मधील बाहेर न जाउ शकणा-या रुग्णांच्या परिचीतांनी पुढाकार घेतला.
काल रक्तदान करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. कठीण प्रंसंगात आजही तीच उदासिनता समाजात दिसते. दोन्ही (जे.जे. किंवा सेंट जॉर्जेस) म्हणावे तेवढे दाते पोचलेले नाहीत.
सकाळी ९.३० मिनिटांनी मुंबईतल्या एका प्रसिद्ध स्टेशन बाहेर शहिदांच्या तसबिरी लागल्या होत्या. खुर्च्यांवर भगिनी समाज स्थिरावला होत्या. अंगावर दागिने, ठेवणीतल्या साड्या. पक्षाचे मोठे शेठ आले. त्यानी फुले अर्पित केली. सुरु झाली भाषणे.
काय वाटले कोणास ठाउक भाषणे झाल्यावर आजुबाजूच्या सुमारे ३३ जणाना रक्तदान केले का? हा प्रष्न विचारला. त्यातील ३० जणाना गेल्या २ महिन्यात काविळ, मलेरिया, टॉयफॉइड ह्या विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. एकाला हेमोग्लोबिन डिफिशियंसी ची ट्रीट्मेंट चालु होती. दोघे सि.एस्.टी वर परिस्थिती सुधारल्यावर(?) विचार करणार होते.एकाने रक्त दिले होते. हाफ शर्ट घातला होता. हाताच्या रंगावरून तर स्प्ष्ट दिसत होते की तो इतर वेळी तो फूल शर्ट घालत असणार.
जाता जाता:सर्व वृत्तवाहीनींवरील चर्चांत एकच गोष्ट आवडली. तो म्हणजे रिटायर्ड मेजर जनरल अशोक मेहता ने विचारलेला प्रष्न. १६ वर्षात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे स्वःत ची कमांडो टीम का नाही.
जर काउंटर ऑफेन्सिव असल्या टीमने २४ तास आधी घेतला असता तर काही जीव वाचले असते का? हा मला पडलेला प्रश्न. आणखी किती वर्षे वाट पहायची आहे आपण?
वाहीनी वर चर्चा करायला येणा-या पाहूण्याना आधी रक्तदान करा आणि नंतर बोला अशी अट घातली तर. हे खर्-या जगात होउ शकत नाही. स्वप्नरंजन करायला काय हरकत आहे.
वाचन
2788
प्रतिक्रिया
8