मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान !!

बबलु · · काथ्याकूट
सर्वप्रथम शहीद झालेल्या सर्व वीरांना सलाम. आज तुमच्यामुळे आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान वाटतो. मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली. जखमींना लवकर आराम मिळो ही ईश्वराकडे प्रार्थना.
  • गेले ३ दिवस चाललेली धुमश्चक्री,
  • अतिरेक्यांनी मारलेले सामान्य नागरीक / शहीद झालेले उत्कृष्ट पोलीस अधिकारी,
  • न भरून येणार्‍या, भळभळणार्‍या जखमा,
  • पूर्ण शहराला ठप्प करण्याची करामत.
भारतावर झालेला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला. आपल्याच घरात घूसून आपल्याला जोरदार चपराक मारली या ईस्लामी अतिरेक्यांनी !! एवढं होऊन सुद्धा आपलं सर्वोच्च नेतृत्व काय करतंय... तर खडसावून ओरडायला आणि पेटून उठायला कचरतंयं. आपलं दुर्दैव की आपण एका दुबळ्याला राजा केलाय. आपल्या घटनेनी फक्त या षंढ नेतृत्वाला दुर्दैवाने संपूर्ण निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे म्हणून हा प्रश्न सर्व मिपाकरंना..... तुम्हाला काय वाटतं... आज नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान हवे होते की नाही ?? (मनापासून प्रतिक्रिया द्या). --- बबलु..

वाचन 16802 प्रतिक्रिया 66