मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भोगानंदिश्वरा

पॉइंट ब्लँक · · भटकंती
नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे. नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला. मंदिराच्या कलाकृतींमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचा आवार प्रशस्त असून तिथे अरुणाचलेश्वर, उमामहेश्वर आणि भोगानंदिश्वर असे तीन मंदिरांचे संकुल आहे. अरुणाचलेश्वर ही महादेबाची बाल अवस्था, भोगानंदिश्वरा ही तारुण्य अवस्था आणि योगानंदिश्वरा ही वैराग्यावस्था मानन्यात येते. भोगानंदिश्वरा हे शिवाच्या तारुण्य अवस्थेला समर्पित केले आहे. मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. त्याचे काही फोटो DSC_0014 DSC_0040 DSC_0574 मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. DSC_0053 प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही अप्सरा. DSC_1259 DSC_0060 DSC_0054 आता मुख्य मंदिराचे काही फोटो. DSC_0233 DSC_0239 DSC_0222 DSC_0221 DSC_1373 आता मंदिरातील मूर्त्या आणि इतर कलाकुसर. bn2 DSC_2572 DSC_2566 DSC_2564 DSC_1320 DSC_1306 DSC_1286 DSC_0632 DSC_0045 DSC_0042 bn30 bn29 bn11 bn10 bn8 bn7 ह्या मंदिराच्या आवारात शृंगेरी तिर्थ नावाची एक मोठी पुष्कर्णी आहे आणि तिथे पिनाकिणी नदिचा उगम होतो असे मानन्यात येते. पुष्कर्णीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला मंड्प. DSC_0625 पुष्कर्णीचे फोटो DSC_0602 DSC_0182 bn12 पुष्कर्णीच्या भोवतलचा परीसर आणि तिथले मूर्तीकाम. bn13 bn15 bn5 bn4 आता नंदिहिल्स वरून सूर्यास्ताच्या वेळी काढलेले काही फोटो. DSC_2475 DSC_0423 चोला, होयसाला आणि विजयनगर ह्यांच्या कलाकृती एकाच ठिकाणी असणारे हे दुर्मिळ मंदिर आहे. प्रत्येक इतिहासप्रेमी मानसाने भेट जरूर द्यावी. मंदिराला भेट देण्यासाठी दोन प्रकारे प्लॅन करता येत. नंदि हिल्स वर सूर्योदय पाहा. मग खाली येवून मंदिराला भेट द्या. किंवा दुपारी दोन-तीनच्या सुमारास आधी मंदिराला भेट द्या मग नंदिहिल्सवर सुर्यास्त पाहायला जा. मंदिराविषयी अधिक माहीत तुम्हाला इथे मिळेल. http://www.karnataka.com/nandi-hills/nandi-village-bhoga-nandeeshwara-temple/

वाचन 8452 प्रतिक्रिया 31