मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणे पासपोर्ट ऑफिसचा त्रास

कपिलमुनी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मानसिक त्रास काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती. १.व्यवस्थित भरलेला फॉर्म २.रीसीट ३.आधार कार्ड ४ पॅन कार्ड ५. शाळा सोडल्याचा दाखला ६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट ७. अ‍ॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी) ८.अ‍ॅनेक्चर ए ( जन्मगाव ) ९. लाइट बिल १०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने) वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अ‍ॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते. प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्‍या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्‍या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्‍या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता. त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अ‍ॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्‍याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना ! दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी १. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत. २. प्रत्येक कर्मचार्‍याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे. ३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा (अशी दिवास्वप्ने आहेत). प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.

वाचन 29622 प्रतिक्रिया 108