मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत...Internship.!

उगा काहितरीच · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, नुकतेच पुणे विद्यापिठातुन MCA(अभियांत्रीकी) या पद्व्युत्तर पदवीचे ५ सत्र पुर्ण केले. विद्यापिठाने सहाव्या सत्रासाठी विषय वगैरे न ठेवता पुर्ण वेळ Internship असा कार्यक्रम आखला आहे. यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कंपनी मध्ये राहुन काम शिकणे वगैरे अपेक्षीत होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत कंपन्यांचापण फायदा होता कारण त्यांना अल्प मानधनावर(stipend)किंवा फुकट काम करायला व्यक्ती मिळते.पण मागील २-३ वर्षापासुन लहानमोठ्या कंपन्या या संधीचा फायदा उठवुन विद्यार्थ्यांकडुन काम करुन घेता घेता training fees च्या नावाखाली ५००० ते ५०,००० रुपये उकळत आहेत. मागच्या जवळपास १ महिन्यापासुन मी Internship साठी पुण्यातल्या भरपुर कंपन्या फिरलो आहे. पण जिथे खरोखर काम चालते व शिकायला मिळेल अशी कंपनी काही मिळाली नाही. माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे पुणेकर मिपाकर IT मध्ये काम करतात. जर कुणी अश्या प्रकारची Internship देउ शकत असेल तर फार मदत होईल.धन्यवाद. (धागा २/३ दिवसात उडवला तरी चालेल.)

वाचन 3929 प्रतिक्रिया 6