मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्हाला काय वाटते?

विकास · · काथ्याकूट
आत्ता म.टा. चाळत असताना "महाराष्ट्राबाहेर एकही परीक्षा जाऊ देणार नाही!" ही बातमी वाचण्यात आली. हे उद्गार अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आहेत :-) बाकी त्यांचे राजकारण अथवा राज्य चालवण्याची पद्धत (?) मला मान्य नसली तरी त्यांचे हे वाक्य कुठेतरी पटले: "महाराष्ट्रात मध्यंतरी परप्रांतियांना मारहाण झाली, अनेक उद्योग बंद पडले. पण, ते सुरू करण्यासाठी स्थानिक कामगार मिळाले नाहीत. आमचा मराठी माणूस ती कामे करण्यास तयार नाही! एखादा उद्योग बंद पाडणे म्हणजे न्याय मिळवून देणे नव्हे" ह्या वाक्यात तथ्य आहे असे वाटते. तर आपल्याला काय वाटते? आपला अनुभव/निरीक्षण आदी येथे सांगू शकलात तर बरे होईल. ही चर्चा राजला चूक ठरवण्यासाठी नक्कीच नाही. राजने आंदोलन केले म्हणून आता काँग्रेसचे असूनही मुख्यमंत्र्यांना, "मी मराठीविरोधी नाही. स्थानिकांना रोजगार मिळालेच पाहिजेत" असे बोलावे लागत आहे. (कदाचीत परवानगी मिळायला वेळ लागला असेल म्हणून उशीरा बोलताहेत इतकेच ;) ) तर हा विषय आपण मराठी माणसे कामे करायला पुढे असतो का ह्या संदर्भात आहे. आणि अशी कामे जी बाहेरून लोंढे येऊन महाराष्ट्रात करत आहेत... (साहेबांच्या बारामतीच्या म्हशी सांभाळण्यापासून...)

वाचन 3713 प्रतिक्रिया 11