मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लघुनिबंध स्पर्धा - "...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!" :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मंडळी, आजपर्यंत मिपावर अतिलघुकथा, पाककृती वगैरेच्या स्पर्धा झाल्या.सर्व मिपाकरांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, अंमळ मजा आली.. ते पाहून मिपाकरांमध्ये अजून एक लघुनिबंध स्पर्धा घ्यायची असे आम्ही ठरवले आहे. विषय - मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण. मोजून दहा ओळी.. निबंधाच्या शेवटी, "...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!" हे वाक्य येणे आवश्यक आहे... निबंधात, "शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य" हा शब्द एकदा तरी आलाच पाहिजे. "फाट्यावर मारणे.." या क्रियापदाचा वापर एकदा तरी करणे आवश्यक आहे. जसे, फाट्यावर मारले, फाट्यावर मारतो, फाट्यावर मारीन.. इत्यादी..! :) कुणाही मिपाकराचा व्यक्तिगत उल्लेख येता कामा नये, जसे तात्या, विसोबा खेचर इत्यादी.. :) त्याऐवजी "मिपाकर", "मिपा व्यवस्थापनवाले", "काही मिपाकर", "मिपा प्रवर्तक" असे उल्लेख चालतील.. चला तर मंडळी, लागा कामाला.. आता येऊ द्यात भराभर तुमचे निबंध. निबंध येथेच द्या. पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे ५१, २१, आणि ११ रुपयांचे रोकडा बक्षिस..! बक्षिसाचा खर्च मिपाचे एक हितचिंतक आहेत अमेरीकेत! ते करणार आहेत.. :) स्पर्धा परिक्षक - मुक्तसुनीत, चतुरंग, प्रा डॉ दिलिप बिरुटे... कुणाला कितवं बक्षिस द्यायचं हे वरील तीन मंडळी एकमेकात पोस्टकार्ड पाठवून ठरवतील.. बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, भाप्रवेळेनुसार रात्री १२ नंतर येणारे निबंध विचारात घेतले जाणार नाहीत.. ऑल द बेस्ट.. :) आपला, (शुद्धलेखनाच्या बाबतीत भयानक काटेकोर असणारा) तात्या.

वाचन 16738 प्रतिक्रिया 50