मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरक्षित खिडकी

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"सेफ विंडो म्हण्जे काय ग मम्मा" ......................................... ़जेवणानंतरचा बिकानेरी सोहन हलवा रंग दाखवत होता. सी.एस.टी ला ठाणे लोकल ला खिडकी पकडुन हिशोब पुरा करायचा बेत केला. रविवार असल्यामुळे खिडकी सोडता गाडी रिकामी होती. एकुलती एक माझ्यासाठी वाट बघत होती. गाडी सुटायला ५ मिनिटे होती. डुलकी लागतच होती इतक्यात " मम्मा मला विंडो" चा हट्ट कानावर आला. डोळे उघडले. ६ वर्षाचे २.५ फुटाचे १०० वॅट डोळे "फुल्ल अ‍ॅटीट्युड" माझ्याकडे रोखुन बघत होते. मी मुकाट्याने समोरच्या बाकावर बसलो. मम्मा आणि मम्माच्या ठम्माने एका सुरात "थँक्यु". ़खिडकी सोडणे मला एका मॉरल डीलेमा मधे टाकणार होते. लोकल आणि ठम्माच्या तोंडाची टकळी एकाच वेळी सुरु झाली. गमाडी ़ जम्मत चे न संपणारे ़कोठार. रीवर्स स्टेल्थ मोड शिवाय झोप शक्यच नव्हती. "मम्मा तुला एक गमाडी सांगु"? इतक्यात मम्माचा फोन वाजतो. ...... "करी रोड पोचतेय" ........................ "विच्चारु नकोस. तोफ्खाना सुरुच आहे" ............................................... "गाडी कशाला उगाच, मी येइन लोकल ने ९ पर्यंत" .................................................................. "ओके. ९ला पाठव." पप्पा येणारच नाही. मला माहीत आहे.- ठम्मा "पप्पा बोलला होता का"? तीच तर गंंमत आहे.सांगु? "सांग" पण सेफ विंडो म्हण्जे काय? ??? आणि टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट म्हणजे काय?ं मम्मा गोंधळली. मी टेक ऑफ साठी सावरुन बसलो. "कुठे ऐकतेस तु हे सगळे?ं (ंमाझ्याकडे एक कौतुक मिश्रीत कटाक्ष) पप्पा बोलत होता. तु गिफ्ट आणायला गेली होतीस ना तेंव्हा. मला सारखा झोपायला सांगत होता. मग मी पण गंमत केली. खोट्टी खोट्टी झोपले. फोन वर बोलत होता. "अग असेल ऑफीस चे काही तरी" पण म्हण्जे काय? "मला नाही माहीत. तु पप्पालाच विचार" मला नाही सांगणार, लहान आहेस म्हणणार. मी ऑफिस च्या नेहा आंटी ला विचारते. माझी फ्रेंड आहे. "तीला काय माहीत"? पप्पा तिच्या कडेच बोलत होता. लॅप टॉप आणायला सांगत होता. चार वाजता येणार आहे नेहा आंटी आपल्या घरी. मम्मा ने माझ्याकडे पाहीले. निर्विकार रहाणे अशक्य होते. मी खिड्कीतुन बाहेर पहायला सुरु केले. दादर स्टेशन च्या घड्याळात ४ वाजले होते. मम्मा चा चेहरा पांढराफटक पडला होता. २ मिनिटांची अशक्य आणि असह्य शांतता. मी खिडकी सोडली नसती तर कदाचित पुढले धर्म सं़कट आले नसते. "काय ़करु काका. कॅच अँड कन्फ्रंट ऑर लेट इट गो" ठम्मा पण बावरली होती. १५ मिनिटात नाती बदलली होती. मे बी इट इज नथींग. अँड इफ इट इज देन आर यू एम्पॉवर्ड टू डील विथ ऑल लाँग टर्म इफेक्टस? युवर कॉल. मम्मा विचार करु लागली. मी ठम्मा शी गप्पा मारायला लागलो. गाडी कुर्ल्याला आली होती. मम्माचा निर्णय झाला. "दादा, ५ मिनिटात घाटकोपर ला ये. घरची चावी माझ्याकडे राहीली आहे. मी ती देउन एका तासात परत येते. ह्या बाबतीत २ तास ़कुणाशीही बोलायचे नाही. बोललास तर खुप मोठा प्रॉब्लेम होइल. घरी मी मैत्रीणी कडे गेली आहे सांग. दिपक चा आला तर फंक्शन मधे बीझी आहे म्हण. वेळ संभाळ" ................... घाटकोपर ला उतरताना मम्माने मागे वळून पाहीले," डोन्ट वरी, लाइक यू सेड इट इज माय कॉल अँड ओनस ऑन मी. थँक्स फॉर द सपोर्ट" "

वाचन 7431 प्रतिक्रिया 28