मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सचिन तेँडूलकर

व्यंकु · · काथ्याकूट
नमस्कार मी सचिन तेँडूलकरचा मोठा भक्त आहे. सचिनने गेली दोन दशके आपलं वर्चस्व सिध्द केलंय. त्यातही अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही आज तो तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे. मध्यंतरीच्या काळात शुमाकरकडून मिळालेली गाडी विलायतेतून भारतात आणताना त्यावरील कर माफ करावा अशी याचना त्याने सरकारकडे केली असता त्याच्यावर टीकेची झोड उठवली गेली मात्र लगेचच त्याने आपण दोनशे मुलांचा सगळा खर्च(जणू दत्तक घेतल्याप्रमाणे) करत आहोत असे सांगितले, पण त्याआधीच ही गोष्ट सिनेतारकांप्रमाणे किंवा नेत्याप्रमाणे जाहीर करुन त्याने आपला टेंबा कधी मिरवला नाही. ऑस्ट्रेलियातील भज्जी आणि सायमंडस् प्रकरणाच्या वेळी भज्जीची चूक नसल्याचा सचिनचा एक ईमेल शरद पवारांना गेला आणि केवळ तेच नव्हे तर अख्खं मंडळ भज्जीच्या बाजूने गेलं. सिनिअर संघात नको असं सांगणारा ढोणी; पण जेव्हा त्याला कळलं कि कर्णधारपदासाठी आपलं नाव सचिननेच सुचवलं आहे तेव्हा मात्र तो पुरता लज्जित झाला असणार आणि त्यानंतरच हा ज्युनिअर सिनिअर वाद थांबला. एकदिवसीय सामन्यात 42 शतके आणि 89 अर्धशतके काढून त्याने भल्या भल्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन त्रेधातिरपीट उडवली आहे कसोटी सामन्यातही 39 शतके आणि 50 अर्धशतके असा त्याचा वरचष्मा आहे. अशा या महान व्यक्तीवर टिका करायची माझ्यासारख्या(अनेक) क्षुद्रांची लायकी नाही. सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम!

वाचन 14109 प्रतिक्रिया 54