मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

विजुभाऊ · · जे न देखे रवी...
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? हे समर्थानासुद्धा जमले नाही उदा: मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे मराठीत शिरिष पै यानी हा प्रकार जपानी मधुन आणला.याला हायकू म्हणतात ( कायकू विचारू नका) मूळ जपानी हायकू मधे तीनच ओळी असतात.... उदा: पानावर फुलपाखरू अलगद विसावले स्वप्नांना भेटत......... मराठीत हायकू चार ओळीत हे असे लिहिता येइल. पावसाचा थेंब तलावात पडला.......... पाण्यावरचा तरंग वाढवत वाढवत..... केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन,सगळे अभिजीत सॄष्टीलावण्य मावशी.सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? होउन जाउदे एकदा म्हणणारा विजुभाऊ

वाचन 31283 प्रतिक्रिया 0