मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुधीर मोघे

विकास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आत्ताच बातमी वाचली: ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन त्यांचे कविता समजण्याच्या वयात काही लाईव्ह कार्यक्रम. दूरदर्शनवर शांता शेळके तसेच इतर तत्कालीन ज्येष्ठ साहीत्यिकांबरोबरील कार्यक्रमात पाहील्याने आणि नंतर त्यांच्या गाण्यांबरोबरच मुख्यत्वे "पक्षांचे ठसे" या काव्यसंग्राहातल्या कविता वाचल्याने डोक्यात राहीले... हा खेळ सावल्यांचा, फिटे अंधाराचे जाळे, सारखी चित्रपट गीते, "सखी मंद झाल्या तारका", "दिसलीस तू फुलले ऋतू" सारखी अवीट गोडीची भावगीते, एकाच या जन्मी जणू, अधांतरी, माझे मन तुझे झाले, सारखी मालीकांची गीते.. काही गीतांना त्यांनी संगित दिग्दर्शन देखील केले आहे. वास्तवीक साहित्यिकांचे/विचारवंतांशी नाते त्यांचे वाचले ऐकलेले असल्याने बहुतेकदा तेव्हढ्यापुरतेच असते. सुधीर मोघ्यांच्याबाबतीत देखील तेच आहे. त्यांचे फोटो बघताना अथवा इकडे-तिकडे क्लिप्स बघताना त्यांच्या चेहर्‍यावर कायम समाधान दिसायचे, पण कुठेतरी त्यांचे यश हे ज्या काळात ते उदयास आले त्या काळाच्या सीमेमुळे असेल कदाचीत पण मर्यादीतच राहीले असे वाटते. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचीच एक आठवणारी कविता खाली देत आहे. त्यांनी (का त्यांच्या सोबत बसलेल्या सुधीर गाडगीळांनी) एकदा कार्यक्रमात ज्या संदर्भाने वाचली त्यावरून ती सावरकरांवर लिहीली असावी हे समजत होते. पण कुठेतरी वाटते की कुठल्याही ध्यासाने/ध्येयाने वेड लागलेल्या व्यक्तीला हे अनुभवयास मिळते. भाषा-विचार समृद्ध करणारा साहित्यिक ही त्यातलीच एक जातकूळ...
ही तक्रार नाही, की गार्‍हाणे नाही, पश्चाताप तर अजिबात नाही आहे फक्त वस्तुस्थिती, तुझ्यासाठी केली सार्‍या आयुष्याची माती
खुणावणारे राजरस्ते तसेच जाउंद दिले, तळहातावरचे ऋतुंचे पक्षि अलगद सोडून दिले चालत राहीलो फक्त एका अटळ आवेगा पाठी...
उकळ्णार्‍या काळोखाने प्राण मंत्रून टाकले, स्फुरणारे उत्सुक ओठ घट्ट शिवून घेतले पापण्यांना दिली सक्त सजा, एका थेंबासाठी...
जे झाले ते चांगले का वाईट? खरंच कळत नाही, आभाळाचे दान टाळून टळत नाही श्रेय एकच, अपादमस्तक तुझी दाहक मिठी...

वाचन 7069 प्रतिक्रिया 21