मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बंबईसे आया मेरा दोस्त

आयुर्हित · · जनातलं, मनातलं
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे” दिवस अगदी मजेत जात होते. नोकरीला लागल्यानंतर एक कंपू असा भेटला कि “रात्र रात्र जागून अगदी सकाळ उजाडेपर्यंत” पीत बसणे हे दर आठवड्याला होऊ लागले. पार्टीचे, वाढदिवसाचे निमित्त करून रात्री उशिरा जेवणे, उशिरा पर्यंत जागत राहणे आजतागायत चालूच राहिले. पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले. (क्रमश:)

वाचन 8261 प्रतिक्रिया 33