कुणी सल्ला देता का हो सल्ला?
गेले काही दिवस नविन मोबाइल फोन घ्यायचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने शोधाशोध चालू होती. मी आयफोन साठी थांबलो होतो. मग आयफोन आधी अमेरिकेत लाँच झाला आणि २-३ दिवसात १० लाख आयफोन विकले गेले... जरा बरे वाटले की चला आता आपणही घ्यायला हरकत नाही. मग हळूहळू आयफोन बद्दल प्रतिकूल मतं यायला लागली. कोणी काही कोणी काही म्हणायला लागले... तेवढ्यात कोणी तरी म्हणाले ब्लॅकबेरी घे, नोकिया इ७१ घे... आणि काय काय. मी पुरता गोंधळून गेलोय. आमच्या राजेभाऊंचं मत आहे की ब्लॅकबेरी चांगला... दुसरा एक मित्र म्हणाला अरे पुढच्या वर्षी खूप नविन मॉडेल्स येत आहेत बाजारात, घाई करू नकोस आत्ता घ्यायची.
तेवढ्यात आज सक्काळी सक्काळी मेल मधे कोण्या एका दुष्ट मित्राने हे पाठवले.
मग तर मी पारच ढेपाळलो... ~X(
तर मंडळी, कुणी सल्ला देता का हो सल्ला?
![]() |
| From My Pictures |
वाचन
19279
प्रतिक्रिया
56
