मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्या फुलांच्या..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मनोगतावर हेमंत पाटील यांनी हे गाणं दिलं आणि या सारखी आणखी कडवी रचता येतील का अशी विचारणा केली.. त्यावर मी खालील कडवी रचली. निश्चितच ती तितक्या ताकदिची नाहीत तरिही मिसळपावकरांनी चमचमीत मानून घ्यावीत... त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ? त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ? त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ? गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ? मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ? वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ? जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ? आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ? जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ? कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ? मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ? या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ? गीतकार : सूर्यकांत खांडेकर छान गाणे आहे ना? पण ही अवघी तीनच कडवी आहेत. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान होत नाही. अजून एक दोन कडवी असती तर मजा आली असती. पण तसे नाही ना... कुणाला पुढे कडवी रचता येतील का? खाली मी २ कडवी रचली आहेत.. पाहा कशी वाटतात.. सावळ्याच्या गाईच्या त्या, तू दूधाची धार का? शूरवीराच्या त्या तळपत्या, तलवारीचा वार का? माथ्याला त्या डोंगराच्या, भेटणारा मेघ का? मेघालाही खेचणारा, वायूचा तू वेग का? पाखाराच्या खोप्यातील, इवलासा जीव का? चहूदिशांना गोठणारी, तू काळोखी हिव का? सूर्य तू अन चंद्र तू रे, अवनीचा तू श्वास का? ईश्वराच्या मन्मनीचा, ध्यास तू आहेस का? - प्राजु.

वाचन 8508 प्रतिक्रिया 10