मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उद्या सकाळी

धनंजय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माझ्या या मराठी सुनीताच्यापुढे त्याचा इंग्रजी अनुवाद दिला आहे. तिथे उपक्रमावर अनुवादाविषयी चर्चा चालू आहे, त्याचे उदाहरण माना पाहिजे असल्यास. हा परायत्त भावानुवाद आहे.
***** उद्या सकाळी गर्‍ गर्‍ से छती फिरति ते नृत्यांगणाचे दिवे भूमी हादरे गदगदा ढोल्के जसे आदळे तालाला तरी मज कुणाच्या मी असे बांधले? बेकाबू मना तनुवरी स्वामित्व ना जाणवे. जाता रात्र ती क्रम-क्रमे आस्तेच तूझ्या सवे हाता हात मी शिवुनि ओठा ओठ ही लावले - तो स्फुल्लिंग ठिणकता अंगांग रोमांचले! वाटे जो रुबाब मजला, आता न काही हवे... नव्हे सत्य ते! ठिणगिचा अग्नी असा चेतता स्वाहा काम हो झडकरी, माझा, तसाही तुझा. भागे ती रती, निवळल्या भस्मातुनी जागतो तेव्हा रे उषा उजळता पाहू उशाशी दुजा - चिंते मी - पुन्हा स्मित करू का त्या जणा देखता प्रत्येका सदैव प्रिय तो एकांत जो भेदतो? ***** Tomorrow morning The disco lights did blink, and crazed revolve, The floor did quake and shudder with the beat; But who was it that then controlled my feet? Who locked my gaze and made reserve dissolve To naught? The night progressed and did evolve. The arms enmeshed, and when the lips did meet (Or brushed), I swelled with heat. And my conceit Was flattered, much. What else did it involve? The friction of the lips can only spark The nether flames. And gladly they’ll consume Themselves and me, and him. They’re but prelude: And worth being burned, if only we resume On embers spent, the morning after dark – And smile to greet trespass of solitude. *****
(मराठी आणि इंग्रजी दोन्ही सुनितांत यमके पेत्रार्क च्या नियमाप्रमाणे आहेत आणि ८+६ ओळींची कडवी आहेत. कलाटणी शेवटच्या ६ ओळींत आहे, दोनच ओळींत नव्हे.)

वाचन 18145 प्रतिक्रिया 0