मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोल्हापुरि मिसळ

झकासराव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोल्हापुरला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीत. नवीन घेतलेल्या कॅमेर्‍यामुळे डोचक्यात फोटो च भुत भिनलय. आणि मावसभावाने नवीन दुचाकी घेतली आहे. मग काय सगळीकडे घुमत होतो. मग अशीच एक दिवस आठवण आली मिसळीची मग मनात ठरवल की कोल्हापुरातली फेमस मिसळ खाल्लीच नाय. मग दुसर्‍याला सजेस्ट करण म्हणजे काठावर उभ राहुन पोहायला शिकवण्यासारखं. :) मग गेलो उद्यमनगरात "फडतरे" मिसळ खायला. हीच ती कोल्हापुरात फार फेमस असलेली आणि वेगवेगळ्या चॅनेल्सनी पण दखल घेतलेली मिसळ. तिकडे बाहेर १५ मिनिट वाट पहावी लागली एवढी गर्दी होती. अगदी लग्नाच्या पंगतीसारखाच प्रकार होता तो. एक छोटी टपरी असावी आधी. मग नंतर वाढवलेला बिजनेस आहे हे दिसत होतच. त्याना विचारल की किती वर्ष झाले ह्या मिसळ ला. तर उत्तर आल की १७ वर्षे झाली. :) मग त्याना विचारुन घेतल आणि फोटो काढले थोडे. तेच तुमच्या सेवेसी हजर करतो. मिसळ पाव खावुन मन तृप्त करुन घेतलच. आता बघुन तुम्ही थोडस समाधान मानुन घ्या. :) http://picasaweb.google.co.uk/zakasrao/FadatareMisal इथे फोटो टाकण्याचा प्रयत्न केला पण नानाची टांग अडत आहे कुठेतरी. जमल नाय परत एकदा. :(

वाचन 16436 प्रतिक्रिया 0