<<मनातलं सांगताच येईना>>
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे!
तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा
आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे.
नाक्या नाक्यावर तुझा हक्क
मला नाकारता येईना
अड्ड्याची जुळवणी
काट्याचा नायटा करतेय...
मुजोरीची बारीक सयही
मला दाखवता येईना
परत आलेल्या पंटरांचीच
सतत सालटी निघतेय...
खातं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता उघडता येईना
उधारीतल्या वारूणी गिळूनही
नरडेच चिंब ना होतेय...
बतावणींची यादी चाळली तरी
अजिबात अंदाज येईना
केव्हातरी मला आठवण येईल
दादागिरी समजूत घालतेय...
वाचन
5628
प्रतिक्रिया
0