पथकर (टोल) वसुली मुळातच घटनाबाह्य..!
मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पथकराविरोधात आंदोलन केले. आमचे या संदर्भात असे मत आहे की सध्या आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून परस्पर जी पथकरवसुली केली जात आहे ती हे मुळातच घटनाबाह्य आहे.
आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम २६५ व २६६ मध्ये याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. कलम २६५ प्रमाणे कोणताही कर हा केवळ सरकारलाच वसूल करण्याचा अधिकार आहे. सदर पथकर हा आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून वसूल होत असल्यामुळे कलम २६५ ची पायमल्ली होत आहे.
कलम २६६ प्रमाणे, सदर गोळा झालेला कर हा प्रथमत: 'कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया' ह्या शीर्षकांतर्भूत खात्यातच जमा झाला पाहिजे. सध्या तसा तो होत नसून आयआरबी ही कंपनी परस्पर स्वत:च्या खात्यात गोळा करत आहे.
सबब, सध्या ज्या पद्धतीने पथकर वसुली होत आहे ती पद्धत मुळातच घटनाबाह्य आहे..या संदर्भात एका निवृत्त सनदी अधिकार्याने मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे कळते..
डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटना समितीच्या सर्व सदस्यांना विनम्र अभिवादन..
जय हिंद..!
-- कॉमॅ.
वाचन
3276
प्रतिक्रिया
12