मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?

मराठमोळा · · काथ्याकूट
स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच? खरं तर उशीर झालाय पण आम्ही बेंचावर असल्याने रात्र आणि दिवस सारखेच आम्हाला. :) असो या प्रतिसादावरुन इथे मुद्दाम चर्चा घडवत आहे. अर्थात इथे शतकी धाग्याची अपेक्षा न ठेवता फक्त चर्चा अपेक्षित आहे एवढेच. मी तज्ञ नाही, महाविचारी नाही, पण एक सामान्य माणूस आहे. स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात? प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का? जातीयवादाप्रमाणे एखादी स्त्री सासू-सारर्‍यांवर आणि नवर्‍यावर सरळ 'केस' करुन फायदा घेत नसेल याची खात्री काय? खरं तर स्त्रियांची शत्रू स्त्रीच आहे का? असा हा चर्चाप्रस्ताव आहे.. कारणं ही तशीच आहेत. घराघरात मुलीला सारुरवास देणार्‍या आया (आईंचे अनेकवचन), लग्नांनंतर त्रास देनार्‍या सासू, नणंदा. मुलाला बायकोशी कसे वागावे हे शिकवणार्‍या माता. सत्यमेव जयते च्या पहिल्या भागात सासुने नवजात मुलगी अर्भकाला लाथाडणारी सासू. तिच्या मुलाला बायकोला मुलगाच माग म्हणणारी सासू. मुलींचे भ्रूणहत्या करा म्हणणारे महिला डॉक्टर.. माझ्या स्वतःच्या लहानपणी पहाण्यात आलेल्या मुलींचे 'अबॉर्शन' करुन नाल्यात फेकणार्‍या मुलींच्या आई. मुलगा दिवा असतो म्हणणार्‍या बायांचा हिशेब कोण लावनार? प्रत्येक वेळी पुरुषांना दोष देणार्‍या समाजाला हा माझा खुला प्रश्न" त्यांना हे प्रत्येकवेळी शिकवणार्‍या तुम्ही अडाणी आणि कित्येकवेळा उच्चभ्रू स्त्रियाच नाही का? बाकी सविस्तर प्रतिसादांवरुन पुन्हा लिहिनंच.. आणि बाकीचेही लिहितील अशी अपेक्षा.. धन्यवाद. आपला मराठमोळा.

वाचन 9634 प्रतिक्रिया 38