मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?

प्यारे१ · · काथ्याकूट
नेहमीप्रमाणं कफ्युज होऊन काकू टाकतोय. एव्हरेस्ट सर करुन आपले (महाराष्ट्रातले) वीर परततील. त्यातले दोघे परिचयाचे आहेत. एव्हरेस्ट मोहिमेबद्दल ऐकलं होतंच. त्याला झालेल्या खर्चाचे आकडे देखील सर्वसाधारणपणे बर्‍याच जणांना ठाऊक असतील. बर्‍यापैकी मोठी असलेली ही रक्कम ह्या वीरांनी लोकवर्गणीतून (बरीचशी) गोळा केली. सकाळी नाष्टा करताना चर्चा सुरु झालेली... (कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. एव्हरेस्ट सर करणं ही अत्यंत धाडसाची, चिकाटीची , नियोजनपूर्वक, अत्यंत संयमानं केलेली तसंच आणखी बरंच बरंच साध्य करवणारी गोष्ट आहेच. ) तरीही जे प्रश्न चर्चिले गेले ते म्हणजे.... १. हे एवढं सगळं करुन नेमकं हाती काय पडलं? अ. संशोधन, विकसन अशा काही गोष्टी केल्या गेल्या का? आ. पर्यावरण विषयक काही केलं गेलं का? २. एव्हरेस्ट सर करणं ही गोष्ट बर्‍याच जणांनी केलेली आहे. नवीन काय? ३. जर हौस म्हणून एव्हरेस्ट सर करायचं होतं तर स्वखर्चानं का केलं गेलं नाही ? ४. लोकांना पैसे मागायचं हे ठीक पण त्या पैशाचा विनियोग झाला त्याचं नेमकं फलित काय? (तिसर्‍या मुद्द्याशी आनुषंगिक पण झालेल्या खर्चाचं मूल्य समजावून सांगणं हा उद्देश) ५. ह्या मोहिमांचा उपयोग म्हणून नेमका काय नी कसा? (बाकी इतरांना सोडा पण ज्यांनी एव्हरेस्ट सर केलं त्यांच्या पोटापाण्याचा तरी प्रश्न सुटणार आहे का?) एव्हरेस्ट सर करुन आलेले दोघे माझ्या ओळखीचे आहेत फार भारी वाटतंय. पण त्याबरोबरच सगळं करुन करायचं काय हा अत्यंत वास्तववादी प्रश्न त्रास देतो आहे. ह्यावर साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे.

वाचन 8948 प्रतिक्रिया 46