चित्रपटसृष्टीचे जनक कोण्??तोरणे कि फाळके?????????
राजा
हरिश्चंद्र’ या मूकपटाच्या आधी वर्षभर प्रदशिर्त झालेल्या ‘पुंडलिक’ या
मूकपटाला पहिल्या भारतीय चित्रपटाचा बहुमान मिळावा. त्याचप्रमाणे ‘पुंडलिक’
निर्माण करणार्या दादासाहेब तोरणे यांना चित्रपटसृष्टीचे जनक अशी उपाधी
देण्यात यावी, अशी मागणी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि इंडियन मोशन
पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे संचालक विकास पाटील यांनी बुधवारी
पत्रकार परिषदेत केली.
दादासाहेब तोरणे यांचा 22 मिनिटे लांबीचा
‘पुंडलिक’ हा मूकपट 18 मे 1912 रोजी प्रदर्शित झाला होता, तर दादासाहेब
फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा 40 मिनिटांचा मूकपट 3 मे 1913 रोजी
प्रदर्शित झाला होता, असे सांगून पाटील यांनी ‘पुंडलिक’ चित्रपटाच्या
इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिराती पत्रकारांना दाखवल्या.
भविष्यात जनहित याचिका
दाखल करण्याचा मार्ग खुला असेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी तोरणे यांचे
पुत्र विजय आणि अनिल तोरणे उपस्थित होते.
वाचन
10895
प्रतिक्रिया
0