मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी वळूनी हासले - चुकले जरासे

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ... असा काहीसा रद्दीफ थोडा बदलून घेतलाय.

वाचन 5081 प्रतिक्रिया 33