मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

बन्याबापू · · काथ्याकूट
नमस्कार मिपाकरानो ! आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे. Image removed. मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.

वाचन 213779 प्रतिक्रिया 130