मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिक्स पराठा ...

पियुशा · · पाककृती
मिक्स पराठा. Image removed. साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप कृती : गव्हाच पीठ , बेसन एकत्र चाळून चवीनुसार मीठ घालुन कणिक भिजवून घ्यावी ,कणिक भिजवताना दोन चमचे तेल घालावं कणिक मऊ होईल. एका पॅनमध्ये तेल गरम करा ,त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईस्तोवर परतून घ्या ,आता त्यात गरम मसाला , लाल तिखट ,हि.मिरची पेस्ट ,आल लसून पेस्ट , हळद ,मीठ ,जीरा पावडर ,कोथिंबीर , पुदिना अन उकडलेले बटाटे हाताने स्म्यश करून टाका ,मिश्रण नीट परतून घ्या आता हे मिश्रण थोड थंड झाल की हाताने पुन्हा एकदा एकजीव करा ,कणकेची पारी करून त्यात हे मिश्रण भरून पराठा लाटा . वरून भरपूर बटर / तुप लावा गरम गरम टेस्टी पराठा ,दही / सॉस , पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा .Image removed. Image removed. Image removed.

वाचन 15328 प्रतिक्रिया 51